बोट क्लबला जलक्रीडा प्रशिक्षणाचा प्रस्ताव: सुनील केदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 01:23 AM2021-07-02T01:23:25+5:302021-07-02T01:23:47+5:30

बोट क्लब येथे होणारे सर्व जलक्रीडा प्रकारांमध्ये अजून वाढ होण्यासाठी विविध जलक्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण होण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशी सूचना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी बोट क्लब गंगापूर धरण येथील जलक्रीडा प्रकार पाहणीच्या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.

Water sports training offered to boat club: | बोट क्लबला जलक्रीडा प्रशिक्षणाचा प्रस्ताव: सुनील केदार

बोट क्लबला जलक्रीडा प्रशिक्षणाचा प्रस्ताव: सुनील केदार

Next
ठळक मुद्देक्रीडामंत्र्यांनी केली बोट क्लबची पाहणी

नाशिक : बोट क्लब येथे होणारे सर्व जलक्रीडा प्रकारांमध्ये अजून वाढ होण्यासाठी विविध जलक्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण होण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशी सूचना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी बोट क्लब गंगापूर धरण येथील जलक्रीडा प्रकार पाहणीच्या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.

गंगापूर धरण येथील बोट क्लबला राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाचे जलक्रीडाचे महाव्यवस्थापक सारंग कुलकर्णी, क्रीडा व युवक सेवा नाशिक विभागाचे उपसंचालक चंद्रकांत कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, नाशिक जिल्हा रोईंग संघटनेचे प्रा. हेमंत पाटील, श्री.तांबे आणि खेळाडू उपस्थित होते.

बोट क्लब पाहणीपूर्वी क्रीडामंत्री केदारे यांनी शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांनी ऑलिम्पिक दिनानिमित्त तयार केलेल्या मास्कचे अनावरण केले. पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुलातील विविध सुविधांची पाहणी केली सिंथेटिक ट्रॅक इतर सुविधांची पाहणी करून त्याबाबत समाधान व्यक्त केले तसेच एनसीसी करता याठिकाणी कार्यालय उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना करून टोकियो ऑलिम्पिक्समध्ये सहभागी होणाऱ्या सर्व भारतातील आणि महाराष्ट्रातील खेळाडूंना क्रीडामंत्री केदार यांनी शुभेच्छा दिल्या.

 

Web Title: Water sports training offered to boat club:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.