रस्त्यातील पाणी वस्तीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 12:57 AM2019-08-02T00:57:53+5:302019-08-02T01:00:49+5:30

लोहोणेर : लोहोणेर - वासोळ रस्त्यावर खालची भिलाटी व आदिवासी वस्तीसमोर मोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यातून मार्गक्रमण करताना दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते आहे. या रस्त्यालगत असलेल्या आदिवासी वस्तीतील घरांमध्ये हे पाणी शिरत असल्याने या पाण्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी पादचारी व वाहनचालकासह या आदिवासी वस्तीतील नागरिकांनी केली आहे.

Water in the street inhabited | रस्त्यातील पाणी वस्तीत

रस्त्यातील पाणी वस्तीत

Next
ठळक मुद्देलोहोणेर-वासोळ रस्ता : नागरिक त्रस्त, वाहनचालक हैराण

लोहोणेर : लोहोणेर - वासोळ रस्त्यावर खालची भिलाटी व आदिवासी वस्तीसमोर मोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यातून मार्गक्रमण करताना दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते आहे. या रस्त्यालगत असलेल्या आदिवासी वस्तीतील घरांमध्ये हे पाणी शिरत असल्याने या पाण्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी पादचारी व वाहनचालकासह या आदिवासी वस्तीतील नागरिकांनी केली आहे.
गेल्या आठवड्यात लोहोणेर परिसरात तीन-चार दिवस संततधार सुरू होती. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होेते. लोहोणेर-वासोळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या खालची भिलाटी या आदिवासी वस्तीजवळच पाणी जमा होते. यामुळे येथे मोठे खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचून सदरचे पाणी इतरत्र निघून जाण्यासाठी कोणतीही वहिवाट नसल्याने ते वस्तीत घुसून घरांमध्ये येत आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष पुरवावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.मार्गक्रमण कठीणसदर ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने व वाहतुकीच्या दृष्टीने या रस्त्यावर पादचारी व दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनांची सतत वर्दळ असल्याने या जीवघेण्या खड्ड्यातून जीव मुठीत धरून मार्गक्र मण करावे लागते. सदरचा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असल्याने या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. सदर ठिकाणी संरक्षक भिंत बांधून सदरचे पाणी इतरत्र वळविल्यास वस्तीतील घरांमध्ये सदरचे पाणी शिरणार नाही.

Web Title: Water in the street inhabited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी