धामोडे भुयारी रेल्वे गेटमध्ये पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 12:41 PM2019-11-15T12:41:01+5:302019-11-15T12:41:12+5:30
पाटोदा : मनमाड सोलापूर रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाच्या वतीने धामोडे गावानजीक गेट नंबर ७९ङ्क्तसी वर प्रवाशी तसेच ग्रामस्थांच्या सोयीसाठी मागील वर्षापासून भुयारी मार्ग बनविण्यात आला आहे.मात्र या भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचत आहे. भुयारी मार्गात अद्यापही सुमारे चार ते पाच फुटापर्यंत पाणी साचलेले असल्याने स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

या ठिकाणी रेल्वे गेट असल्याने या मार्गावर गाडी जाण्या-येण्याच्या वेळेस सुमारे तास दीड तास गेट बंद राहात असल्याने प्रवाशी तसेच वाहनधारकांना येथे ताटकळत थांबावे लागत होते.त्यामुळे या ठिकाणी पर्यायी भुयारी मार्गाची व्यवस्था करावी अशी मागणी होती.या मागणीची रेल्वे विभागाने दखल घेऊन या ठिकाणी भुयारी मार्गाची निर्मिती केली आहे.त्यामुळे प्रवाशी व वाहनधारकांना दिलासा मिळाला होता.मात्र मागील पंधरवड्यात झालेल्या पावसाने भुयारी मार्गात पाणी साचून या मार्गावरील वाहतूक पूर्णता बंद झाली असून आजही या भुयारी मार्गात पाणी साचलेले असल्याने ग्रामस्थ तसेच प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पर्यायी मार्ग व्यवस्था नसल्याने नाराजी पसरली आहे.या भागातील शेतकरी आपला शेतमाल लासलगाव येथे विक्र ीसाठी नेण्यासाठी हाच मार्ग जवळचा असून यातून शेतकर्यांचा वेळ व पैशाची बचत होते .तसेच नगरसूल ,धामोडे,राजापूर या भागातील प्रवाशांना मनमाड महामार्गावर जाण्यासाठी सुमारे दहा बारा किलोमीटर लांब येवला व इतर मार्गाने प्रवास करावा लागत असल्याने नाराजी पसरली आहे.