चांदवड तालुक्यात ११ गावे २१ वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 07:04 PM2019-03-20T19:04:07+5:302019-03-20T19:04:40+5:30
चांदवड : चांदवड तालुक्यात ११ गावे,२१ वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असुन दररोज ३ टॅँकर द्वारे ११ फेऱ्या मारण्यात येत आहे.मार्च महिन्याच्या मध्यावरच चांदवड तालुक्यातील बऱ्याच गावावर विहिरी,बोअरवेल,जलसाठे कोरडे ठाक पडल्याने बºयाच भागात पाणी टंचाईची तीव्रता वाढत आहे.
चांदवड : चांदवड तालुक्यात ११ गावे,२१ वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असुन दररोज ३ टॅँकर द्वारे ११ फेऱ्या मारण्यात येत आहे.मार्च महिन्याच्या मध्यावरच चांदवड तालुक्यातील बऱ्याच गावावर विहिरी,बोअरवेल,जलसाठे कोरडे ठाक पडल्याने बºयाच भागात पाणी टंचाईची तीव्रता वाढत आहे.
चांदवड तालुक्यात ४ गावे व ५ वाड्यांना ३ टॅँकर द्वारे पाणी पुरवठा सुरू असून ५ गावे ५ वाड्यांचे प्रस्ताव प्रांतकार्यलयात पाठविल्याची माहिती गटविकास अधिकारी हिरामण मानकर व पाणीपुरवठा अधिकारी मोरे यांनी दिली.चांदवड तालुक्यातील गत पावसाळ्यात मागील वर्षाच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने मार्च महिन्याच्या मध्यावर तालुक्यातील जलसाठ्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.त्यामुळे तालुक्यातील हिरापूर,बोपाणे,कळमदरे,परसूल या चार गावांसह हिरापूर येथील धनगरवाडी,तळेगावरोही येथील दत्तवाडी,घुमरेवस्ती,बजरंगनगर व काजीसांगवी येथील दुर्गानगर या ५ वाड्यांना ३ टॅँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे.चांदवड येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या साडेसहा लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभातुन टॅँकरच्या दररोज ११ फेºया होत आहेत.शासनाकडे मागणी करण्यात आलेल्या टंचाईग्रस्त गावातील प्रस्तावांच्या मंजुरीअगोदर त्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे की नाही याची शहानिशा केल्यानंतरच प्रस्ताव सादर करा असे प्रशासनाचे निर्देश असल्यानेच तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्यामार्फेत संयुक्त पाहणी केली जात असून आवश्यक तेथे टॅँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी मंजूरी देण्यात येत आहे.टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टॅँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे.