चांदवड तालुक्यात १४ गावे, ५२ वाड्यांना १८ टॅँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 06:48 PM2019-05-31T18:48:24+5:302019-05-31T18:49:14+5:30
चांदवड : तालुक्यात १४ गावे, ५२ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, दररोज १८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मार्च महिन्याच्या मध्यावरच चांदवड तालुक्यातील बऱ्याच गावांवर विहिरी, बोअरवेल, जलसाठे कोरडेठाक पडल्याने बºयाच भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली होती. मे महिनाी संपत आला तरी पाणीटंचाईची समस्या कायम आहे.
तालुक्यातील भयाळे व गोहरण या दोन गावांचे तसेच १८ वाड्यांचे प्रस्ताव मंजूर झाले असून, त्या गावांनाही लवकरच टॅँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. ४४ गाव नळ पाणीपुरवठा योजनेच्या टाकीवरून एवढ्या गावांची तहान भागत नसल्याने निफाड तालुक्यातील शिवरे येथील विहीर अधिग्रहीत केली असून, तेथून पाणी भरण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या विहिरीचेही पाणी किती दिवस पुरेल याबाबत प्रशासनाने शंका व्यक्त केली असून यंदाचा दुष्काळ तीव्र असल्याची माहिती प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील व पाणीपुरवठा अधिकारी सी.जे. मोरे यांनी दिली. चांदवड तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने मार्च महिन्याच्या मध्यावर तालुक्यातील जलसाठ्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील हिरापूर, बोपाणे, कळमदरे, परसूल, देवरगाव, भोयेगाव, जोपूळ, उसवाड, नांदुरटेक, राहुड, नारायणगाव, कुंडाणे, खडकओझर, गुºहाळे या चौदा गावांसह हिरापूर येथील धनगरवाडी, तळेगाव रोही येथील दत्तवाडी, घुमरे वस्ती, बजरंगनगर व काजीसांगवी येथील दुर्गानगर, भाटगाव येथील माळी वस्ती, नांदुरटेक येथील चिचंबारी वस्ती, शिंगवे येथील झाल्टे, मढे , रामवाडी, खताळ, शिंदे, शेख, गुंड, रायपूर येथील बारभाई, मदरवाडी, रानमळा, गंगावे, दुगाव रोड, तुकाराम वाडी, कातरवाडी येथील रानमळा, भडाणे येथील पट्टीचा मळा, दत्तवाडी, मेसनखेडे खुर्द येथील ठोंबरे वस्ती, मार्कंड वस्ती, जेजुरे वस्ती, निंबाळे येथील कोल्हे, खर्डी, गाढे, पाटोळेवस्ती, शिंदे तर गंगावे येथील नरोटेवस्ती व राजदेरवाडी येथील भामदरी वस्ती, काळखोडे येथील शेळके वस्ती, डुकरे वस्ती, वाकी खुर्द येथील देवढेवस्ती, गोरडे वस्ती, पन्हाळे येथील सोनवणे वस्ती, देवरगाव येथील गोधडेवस्ती, पिंपळवस्ती, गायराण वस्ती, रेडगाव खुर्द येथील काळेवस्ती, साळसाणे येथील ठाकरे, शिंदे वस्ती, तळेगाव रोही येथील आंबेडकर वस्ती, मल्हारनगर, वाहेगावसाळ येथील मुस्लीम वस्ती, खैरे वस्ती, गांगुर्डे वस्ती, वाणी मळा तर कोलटेक येथील खांगळवस्ती, पाटे येथील शिंदे वस्ती, वाकी बुद्रूक येथील शेलार वस्ती, वडगावपंगू येथील कांडेकर वस्ती, गोजरे वस्ती, शिरुर येथील कारवाडी, नन्हावे येथील मोगलवस्ती, खडकओझर, गु-हाळे, विटावे येथील योगेश्वरवस्ती, सोनीसांगवी, ठाकरे वस्ती या ५२ वाड्यांना १८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. चांदवड येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या साडेसहा लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभातून टॅँकरच्या दररोज फेºया होत आहेत. शासनाकडे मागणी करण्यात आलेल्या टंचाईग्रस्त गावातील प्रस्तावांच्या मंजुरीअगोदर त्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे की नाही याची शहानिशा केल्यानंतरच प्रस्ताव सादर करा, असे प्रशासनाचे निर्देश असल्यानेच तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्यामार्फत संयुक्त पाहणी केली जात आहे.