जाणता राजा प्रतिष्ठानकडून ४० गावांना टॅँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 05:29 PM2019-05-13T17:29:29+5:302019-05-13T17:30:29+5:30
सिन्नर : तालुक्यातील डुबेरे येथे जाणता राजा प्रतिष्ठान (मुंबई) व माऊली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागातील ४० गावांना पिण्याच्या पाण्यासाठी व शेतकऱ्यांसाठी मोफत टॅँकरद्वारे पाणीवाटप मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.
दररोज ५ टॅँकरद्वारे ३० हजार लिटर पाण्याचे वेगवेगळ्या गावात पाण्याचे वितरण करण्यात येणार आहे. जाणता राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत फोमन, उपाध्यक्ष राकेश चव्हाण, राज्य सचिव संतोष ठाकूर, उपसचिव रवी खाटवी, मुंबई प्रदेशाध्यक्ष शशांक कोदे, राजेश बापट, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे, जाणता राजा प्रतिष्ठानचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर ढोली, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, प्रीतेश नांदीवडेकर, दिलीप अडसुळ, सुनील आर्या, ग्रामपंचायत सदस्य रेखा ढोली यांच्या उपस्थितीत या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. जो पर्यंत तालुक्यात चांगल्या प्रकारचा पाऊस होत नाही, लोकांच्या पाण्याचा प्रश्न कमी होत नाही तोपर्यंत जाणता राजा प्रतिष्ठानतर्फे स्वखर्चाने मोफत पाणीवाटप केले जाणार असल्याचे फोमन यांनी सांगितले. डुबेरेसाठी विहिर खोदून देणार असल्याचे प्रतिष्ठानचे ढोली यांनी सांगितले. प्रतिष्ठानने पाच टॅँकर उपलब्ध करुन दिले असून एका गावात एकाच वेळी पाच टॅँकरद्वारे पाणी वितरीत केले जाणार आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने माणसांप्रमाणे जनावरांनाही पाण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हाध्यक्ष ढोली यांनी दुष्काळाची तीव्रता प्रास्तविकात मांडल्यानंतर प्रतिष्ठानद्वारे वेगवेगळ्या गावांत टॅँकरने पाणी पुरवठ्याचा उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी महेश चांगो, किशोर मयेकर, संजय वाघमारे, रवी खाटवी, शशांक फुल, राजेश बापट, संतोश चव्हाण, प्रीतेश नांदिवडेकर, दिलीप अडसुळ, सुनील आर्या, सोमनाथ वाघमारे, सोमनाथ भिसे, रेखा ढोली आदी उपस्थित होते. तेजस ढोली यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञानेश्वर ढोली यांनी आभार मानले.