४९३ ठिकाणी साचणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 01:32 AM2018-06-06T01:32:11+5:302018-06-06T01:32:11+5:30

नाशिक : महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून पावसाळी गटार योजना राबविली असली तरी प्रत्यक्षात मात्र शेकडो ठिकाणी तळे साचल्याने पालिकेचे पितळ उघडे पडते. महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार शहरातील विविध विभागात तब्बल ४९३ ठिकाणी पाणी साचणार असून, संभाव्य संकट टाळण्यासाठी नालेसफाईसह अन्य उपाययोजना युद्धपातळीवर सुरू केल्या आहेत.

Water supply to 493 places | ४९३ ठिकाणी साचणार पाणी

४९३ ठिकाणी साचणार पाणी

Next
ठळक मुद्देपाणी साचणारी महत्त्वाची ठिकाणे पालिकेची यादी : नालेसफाईसह अन्य कामांना वेग

नाशिक : महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून पावसाळी गटार योजना राबविली असली तरी प्रत्यक्षात मात्र शेकडो ठिकाणी तळे साचल्याने पालिकेचे पितळ उघडे पडते. महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार शहरातील विविध विभागात तब्बल ४९३ ठिकाणी पाणी साचणार असून, संभाव्य संकट टाळण्यासाठी नालेसफाईसह अन्य उपाययोजना युद्धपातळीवर सुरू केल्या आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात अनेक सखल भागात पाणी साचते आणि त्यामुळे संपूर्ण शहरात वाहतूक ठप्प होत असते. गेल्यावर्षी जून महिन्यात सायंकाळी तासाभरात जोरदार झालेल्या पावसामुळे अशीच नाशिककरांची दैना उडाली होती आणि पालिकेच्या नियोजनाच्या चिंधड्या उडाल्या होत्या. सदरचे प्रकरण प्रशासनावर शेकणार असे लक्षात येताच महापालिकेने दोन तासांत ९२ मिलिमीटर अतिवृष्टी झाली, असा दावा केला होता. दरम्यान, यंदा अशाप्रकारची दैना टाळण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.
महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात तब्बल ४९३ पाणी साचणारी ठिकाणे असून, तेथे पाण्याचा निचरा व्हावा यासाठी नालेसफाईवर भर देण्यात आला आहे. मात्र शहरात नालेसफाईचे कामे होत नसल्याने पाणी तुंबण्याची शक्यता वाढली आहे.पश्चिम विभाग- सराफ बाजार, ओकाची तालीम, दहीपूल, सिद्धेश्वर मंदिर, शुक्लगल्ली कॉर्नर, न्यू मराठी शाळा डोंगरे मैदानाजवळ, चोपडा लॉन्स, जुना गंगापूर नाका, पंडित कॉलनी, राजीव गांधी भवनासमोर, नवरचना हायस्कूलसमोर, खतीब डेअरी, मंगलवाडी, विसे चौकाची दक्षिण बाजू, मारिया विहारचे प्रवेशद्वार, निर्मला कॉन्व्हेंट, होरायझन स्कूल, गीतांजली सोसायटी, कुसुमाग्रज स्मारक, शहीद चौक, रविशंकर अपार्टमेंट, महात्मानगर, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, एबीबी सर्कल, पी अ‍ॅन्ड टी कॉलनी, गोदावरी कॉलनी, विजन हॉस्पिटलमागे, आम्रपाली सोसायटी, डिसूझा कॉलनी, सहवासनगर, कुटेमार्ग, राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र, सिटी सेंटर मॉल, मुंबई नाका, संदीप हॉटेलजवळ, साठे चौक, खडकाळी. पूर्व विभाग- अमरधामरोड, कन्नमवार पूल, काठेगल्ली येथील त्रिकोणी गार्डन, बनकर चौक, रवींद्रनाथ विद्यालय चौक, टाकळीगाव, वैदूवाडीजवळ, इच्छामणी सोसायटी, रामदास स्वामीनगर, कन्हैया स्वीटजवळ, अशोकामार्ग, पखालरोड, वडाळारोड, डीजीपीनगर मारुती मंदिराजवळ, गायकवाड सभागृह, बापूबंगला.पंचवटी विभाग
दिंडोरी नाका, रूपश्री बिल्डिंग, पंचवटी पोलीस ठाण्यासमोर, चित्रकुट सोसायटी, लकडापूल, मखमलाबाद नाका, रामवाडी पूल, चिंचबन, बायजाबाईची छावणी, औदुंबरनगर, अमृतधाम, कोणार्कनगर.सातपूर विभाग
सातपूर कॉलनी, आंबेडकर भाजी मार्केट, कांबळेवाडी, कामगारनगर, संत कबीरनगर, आनंदवली, अशोकनगर, शिवाजीनगर, सीपी टूल झोपडपट्टी, संतोषी मातानगर, एमआयडीसी.सिडको विभाग
सिंहस्थनगर, खुटवडनगर, पवननगर, गणेश चौक, माउली लॉन्स, महाराणा प्रताप चौक, दत्त चौक, त्रिमूर्ती चौक, संभाजी चौक, आयटीआय पूल, गोविंदनगर, इंदिरानगर, अंबड पोलीस ठाणे, संभाजी सोसायटी.

Web Title: Water supply to 493 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.