नऊ गावांना ५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 09:27 PM2020-05-20T21:27:32+5:302020-05-20T23:53:32+5:30
पेठ : मे महिन्याने मध्यान्ह गाठल्याने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबरोबर पाणीटंचाईने डोके वर काढले असून, पेठ तालुक्यातील ७३ गावे व ३० वाड्या अशा १०३ गावांचा टंचाईग्रस्त आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. सात गावे व दोन वाड्यांना पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
पेठ : (रामदास शिंदे) मे महिन्याने मध्यान्ह गाठल्याने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबरोबर पाणीटंचाईने डोके वर काढले असून, पेठ तालुक्यातील ७३ गावे व ३० वाड्या अशा १०३ गावांचा टंचाईग्रस्त आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. सात गावे व दोन वाड्यांना पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
पेठ तालुका तसा नाशिक जिल्ह्यात पर्जन्यमानाच्या दृष्टीने जवळपास दुसऱ्या
क्रमांकावर असतो. मात्र प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती व सिंचन प्रकल्पांचा अभाव यामुळे जानेवारीपासून बहुतांश गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागतात. सुदैवाने मागील वर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत मागील वर्षाच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. पेठ तालुक्यात सद्यस्थितीत तोंडवळ, शिदमाळ, हनुमंतपाडा (भू.), आमडोंगरा, डोंगरशेत, मोहपाडा, सादडपाडा (रान.), घुबडसाका, उखळीमाळ, रानविहीर या गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, तिळभाट, वैतागपाडा, खोकरतळे, नवापाडा, अंबास, सादडपाडा (सु.), मोहालीपाडा, सातपुतेपाडा आदी गावातील खासगी विहिरींचे अधिग्रहण करून नागरिकांची तहान भागवली जात आहे.
उपविभागीय अधिकारी दिंडोरी यांच्याकडे दुसºया टप्प्यातील जांभूळमाळ, घोटविहिरा, मानकापूर, चिरेपाडा, बोरीचीबारी, मांडणपाडा, निरगुडे, भिंतघर या गावांचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार संदीप भोसले, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, उपअभियंता वसंत गवळी आदी टंचाई निवारणासाठी प्रयत्नशील आहेत.
-----------------------------
शिराळे धरणात पुरेसा साठा पेठ शहराच्या पाचवीला पूजलेली पाणीटंचाई शिराळे धरणामुळे कायमची मिटली असून, सद्यस्थितीत पेठ शहराला पाणीपुरवठा करणाºया शिराळे धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने पेठवासीयांची टंचाईपासून मुक्तता झाली आहे. शिवाय पाहुचीबारी, हरणगाव, गावंधपाडा, इनामबारी, पाटे, शिंदे आदी लहानमोठ्या धरणात पाणीसाठा असल्याने परिसरातील गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे.
२ सोशल नेटवर्किंग फोरम यासारख्या सामाजिक संस्थेने शेवखंडी, खोटरेपाडा, वाजवड, केळबारी, वडपाडा आदी गावांना मोफत पाणीपुरवठा योजना राबवत टंचाईच्या खाईतून बाहेर काढले आहे. आपली आपुलकी बहउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून उद्योजक दौलत कुशारे व नंदा कुशारे यांनी अतिदुर्गम बोंडारमाळ या गावाची ७० वर्षांपासूनची पाण्याची तहान भागवली.
----------------------------------------
पेठ तालुक्यातील १०३ गावांसाठी संभाव्य टंचाई आराखडा पंचायत समिती लघु पाटबंधारे व महसूल विभागाच्या समन्वयाने तयार करण्यात आला असून, प्राधान्यक्र माने टंचाईग्रस्त गावांना ५ टँकरद्वारे व खासगी विहीर अधिग्रहीत करून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. संभाव्य टंचाई निर्माण होणाऱ्या गावांसाठी तालुका प्रशासनाने उपाययोजना केली असून, कोरोनाच्या संकटात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही यासाठी प्रशासन काम करीत आहे.
- संदीप भोसले, तहसीलदार, पेठ