पाणीपुरवठाही ठप्प : वीज सेवेवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 10:05 PM2020-07-21T22:05:01+5:302020-07-22T00:57:39+5:30

नांदगाव : राष्ट्रीय महामार्गाचे काम रेंगाळू लागल्याने या कामाचा परिणाम वाहतूक कोंडीसोबत आता शहरातील पाणीपुरवठा व वीजपुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या सेवेवर झाला आहे.

Water supply also disrupted: Impact on electricity service | पाणीपुरवठाही ठप्प : वीज सेवेवर परिणाम

पाणीपुरवठाही ठप्प : वीज सेवेवर परिणाम

Next

नांदगाव : राष्ट्रीय महामार्गाचे काम रेंगाळू लागल्याने या कामाचा परिणाम वाहतूक कोंडीसोबत आता शहरातील पाणीपुरवठा व वीजपुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या सेवेवर झाला आहे. मनमाड वळण रस्त्यापासून सुरू झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या या कामाच्या रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या वीजवाहक तारा व खांब शिफ्ट करण्याच्या नावाखाली गेल्या महिनाभरापासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. दूरध्वनी विभागाच्या सेवेलाही त्याची झळ पोहोचली आहे. शिवाय काही ठिकाणी पालिकेच्या पाणीपुरवठा करणाºया जलवाहिन्याही हटविण्यात आल्याने नागरी वसाहतीचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
सर्वात महत्त्वाचे ग्राहकांना भारनियमन नसतानाही खंडित वीजपुरवठ्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या रेंगाळत असलेल्या कामाबाबत तीन आठवड्यापूर्वी आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महामार्गाचे अभियंता व ठेकेदारांना कामाला गती देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या, मात्र या महामार्गाचे काम अजूनही न्यू इंग्लिशच्या पुढे सरकू शकलेले नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात एकेरी वाहतुकीची कोंडी बघावयास मिळते.
महामार्गाच्या कामातली शिथिलता अशीच सुरू राहिली तर परिसरातील नागरिकांना वीजपुरवठ्यासाठी वेठीला धरले जाणार हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. सदर काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
----------------------
विद्यार्थ्यांची गैरसोय
कोरोनामुळे विद्यार्थी घरूनच आॅनलाइन अभ्यासक्र माला संलग्न झाले असल्याने या खंडित वीजपुरवठ्याची झळ त्यांनाही बसली आहे. वीजपुरवठा किती काळासाठी खंडित होणार याबाबतचे नियोजन नसल्याने या गोंधळात भर पडली आहे. विद्यार्थ्यांचा वीज नसल्याने नाहक वेळ वाया जात आहे.
-------------
संबंधित विभागाने वीजपुरवठा खंडित करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून परवानगी मिळविली आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करावा लागत आहे.
- किरण कांडेकर,
शहर अभियंता, नांदगाव

Web Title: Water supply also disrupted: Impact on electricity service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक