नाशिक शहरात उद्या पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:38 AM2021-02-20T04:38:53+5:302021-02-20T04:38:53+5:30

गंगापूर धरणाच्या रॉ वाॅटर पंपिंग स्टेशनाच्या ठिकाणी असलेल्या महिंद्रा फीडरवरील आऊटगोईंग क्युबिकल येथे केबल किट नादुरुस्त झाल्यामुळे याठिकाणी मिटरिंग ...

Water supply to be cut off in Nashik tomorrow | नाशिक शहरात उद्या पाणीपुरवठा बंद

नाशिक शहरात उद्या पाणीपुरवठा बंद

Next

गंगापूर धरणाच्या रॉ वाॅटर पंपिंग स्टेशनाच्या ठिकाणी असलेल्या महिंद्रा फीडरवरील आऊटगोईंग क्युबिकल येथे केबल किट नादुरुस्त झाल्यामुळे याठिकाणी मिटरिंग क्युबिकल केबलची जोडणी करुन टेस्टिंग करण्यात येणर आहे. या कामासाठी शनिवारी (दि.२०) सकाळी १० वाजता ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित ठेवावा लागणार आहे. त्यामुळे गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथील रॉ वॉटर पंपिंग होणार नसल्याने शनिवारी दुपारी व सायंकाळी पंचवटी, नाशिकरोड, सातपूर व पश्चिम विभागात पाणीपुरवठा बंद राहील. त्याच प्रमाणे सिडको विभागात प्रभाग क्रमांक २४, २५, २६ व २८ येथील उंटवाडी जगताप नगर, कालिका पार्क, इंद्रनगरी, कामटवाडे परिसर, पवननगर, आयटीआय पूल, शिवशक्ती चौक, शाहू नगर, खुटवड नगर, बंदावणे नगर, साळुखे नगर, महालक्ष्मी नगर, डीजीपी क्र. २, मुरारी नगर, वावरे नगर, अंबड माऊली लॉन्स परिसर आणि

पूर्व विभागातील वडाळा गाव, गावठाण परिसर, वडाळा रोड, जे. एम. सिटी कॉलेज, जयदीप नगर, साईनाथ नगर, विनयनगर परिसर, द्वारका व काठे गल्ली, जयशंकर नगर, टाकळी रोड परिसर, उपनगर पगारे मळा, प्र.क्र. २३ मधील अशोका मार्ग, हिरे नगर, टागोर नगर, डीजीपी नगर व गांधनीगर जलकुंभ १, २, ३ व ४ प्र.क्र. १६ मधील आंबेडकर नगर, सिध्दार्थ नगर, शिवाजीनगर परिसर, उत्तरा नगर, बोधलेनगर, गायत्रीनगर, अयोध्यानगर, प्र.क्र. २३ मधील डीजीपी नगर (भागश:) कल्पतरुनगर, हॅपी होम कॉलनी, व बजरंगवाडी भागातही शनिवारी (दि. २०) दुपारी व सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. रविवारी (दि.२१) सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने कमी प्रमाणात होईल, असे महापालिकेने कळवले आहे.

Web Title: Water supply to be cut off in Nashik tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.