आज शहरातील पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 12:45 AM2021-01-02T00:45:10+5:302021-01-02T00:46:50+5:30
गोंदे येथील ३३ के.व्ही.चा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने नाशिक महापालिकेला मुकणे धरणातून होणारा नियमित पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने शनिवारी नाशिक पूर्व व नवीन नाशिक या भागात दिवसभर पाणीपुरवठा होणार नाही, तसेच रविवारी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.
नाशिक : गोंदे येथील ३३ के.व्ही.चा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने नाशिक महापालिकेला मुकणे धरणातून होणारा नियमित पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने शनिवारी नाशिक पूर्व व नवीन नाशिक या भागात दिवसभर पाणीपुरवठा होणार नाही, तसेच रविवारी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.
मुकणे धरणातून महापालिकेसाठी पाणी उचलण्यासाठी पंपिंग स्टेशनला गोंदे येथील रेमंड सबस्टेशनमधून वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. या सबस्टेशनमध्ये ब्रेकर उभारणीसाठी शनिवारी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपावेतो महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मनपाचे विल्होळी जलशुद्धीकरण केंद्र (मुकणे प्रकल्प) येथून होणारा पाणीपुरवठा करणे शक्य होणार नसल्याने नवीन नाशिकमधील प्रभाग क्र. २४, २५, २६, २२ भागश: व २७, २८, २९, ३१ या संपूर्ण प्रभागांचा तसेच नाशिक पूर्वमधील प्रभाग क्र. १४, १५, २३, ३० भागश: या प्रभागांमध्ये (सकाळ व सायंकाळचा) संपूर्ण दिवसभर पाणीपुरवठा होणार नाही, तसेच रविवार (दि. ३) रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, याची दखल नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.