आज शहरातील पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:13 AM2021-01-02T04:13:09+5:302021-01-02T04:13:09+5:30
मुकणे धरणातून महापालिकेसाठी पाणी उचलण्यासाठी पंपिंग स्टेशनला गोंदे येथील रेमंड सबस्टेशनमधून वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. या सबस्टेशनमध्ये ब्रेकर उभारणीसाठी ...
मुकणे धरणातून महापालिकेसाठी पाणी उचलण्यासाठी पंपिंग स्टेशनला गोंदे येथील रेमंड सबस्टेशनमधून वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. या सबस्टेशनमध्ये ब्रेकर उभारणीसाठी शनिवारी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपावेतो महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मनपाचे विल्होळी जलशुद्धीकरण केंद्र (मुकणे प्रकल्प) येथून होणारा पाणीपुरवठा करणे शक्य होणार नसल्याने नवीन नाशिकमधील प्रभाग क्र. २४, २५, २६, २२ भागश: व २७, २८, २९, ३१ या संपूर्ण प्रभागांचा तसेच नाशिक पूर्वमधील प्रभाग क्र. १४, १५, २३, ३० भागश: या प्रभागांमध्ये (सकाळ व सायंकाळचा) संपूर्ण दिवसभर पाणीपुरवठा होणार नाही, तसेच रविवार (दि. ३) रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, याची दखल नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.