नाशिक शहरात शनिवारी पाणी पुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 06:59 PM2021-02-18T18:59:18+5:302021-02-18T19:02:27+5:30
नाशिक- गंगापूर धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशनच्या दुरूस्तीचे काम येत्या शनिवारी (दि.२०) करण्यात येणार असून त्यामुळे शहराच्या बहुतांश भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
नाशिक- गंगापूर धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशनच्या दुरूस्तीचे काम येत्या शनिवारी (दि.२०) करण्यात येणार असून त्यामुळे शहराच्या बहुतांश भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
गंगापूर धरणाच्या रॉ वाॅटर पंपीग स्टेशनाच्या ठिकाणी असलेल्या महिंद्रा फिडरवरील आऊटगोईंग क्युबिकल येथे केबल किट नादुरुस्त झाल्यामुळे याठिकाणी मिटरींग क्युबिकल केबलची जोडणी करुन टेस्टिंग करण्यात येणर आहे. या कामासाठी शनिवारी (दि.२०) सकाळी १० वाजता ते सायंकाळी ५ वाजता पर्यंत वीज पुरवठा खंडीत ठेवावा लागणार आहे. त्यामुळे गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथील रॉ वॉटर पंपींग होणार नसल्याने शनिवारी दूपारी व सायंकाळी पंचवटी, नाशिकरोड, सातपूर व पश्चिम विभागात पाणी पुरवठा बंद राहील. त्याच प्रमाणे सिडको विभागात प्रभाग क्रमांक २४, २५, २६ व २८ येथील उंटवाडी जगताप नगर, कालिका पार्क, इंद्रनगरी, कामटवाडे परिसर, पवननगर, आयटीआय पूल, शिवशक्ती चौक, शाहू नगर, खुटवड नगर, बंदावणे नगर, साळूंखे नगर, महालक्ष्मी नगर, डीजीपी क्र. २, मुरारी नगर, वावरे नगर, अंबड माऊली लॉन्स परिसर आणि
पूर्व विभागातील वडाळा गांव, गावठाण परिसर, वडाळा रोड, जे. एम. सिटी कॉलेज, जयदीप नगर, साईनाथ नगर, विनयनगर परिसर, द्वारका व काठे गल्ली, जयशंकर नगर, टाकळी रोड परिसर, उपनगर पगारे मळा, प्र.क्र. २३ मधील अशोका मार्ग, हिरे नगर, टागोर नगर, डीजीपी नगर व गांधनीगर जलकुंभ १, २, ३ व ४ प्र.क्र. १६ मधील आंबेडकर नगर, सिध्दार्थ नगर, शिवाजीनगर परिसर, उत्तरा नगर, बोधलेनगर, गायत्रीनगर, अयोध्यानगर, प्र.क्र. २३ मधील डीजीपी नगर (भागश:) कल्पतरुनगर, हॅपी होम कॉलनी, व बजरंगवाडी भागातही शनिवारी (दि. २०) दूपारी व सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. रविवारी (दि.२१) सकाळी पाणी पुरवठा कमी दाबाने कमी प्रमाणात होईल, असे महापालिकेने कळवले आहे.