देवगाव येथे दिवसाआड पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 05:56 PM2019-02-04T17:56:33+5:302019-02-04T17:57:21+5:30
देवगाव : गावाला पाणीपुरवठा करणार्या विहिरीची पाण्याची पातळी कमी झाल्याने आणि गावातील हातपंपाच्या पाण्याने तळ गाठल्याने पाण्याची टंचाई जाणवत असून ग्रामपंचायतीने नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा दिवसाआड केला आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तेव्हा गोदावरी डावा कालव्याचे आवर्तन त्विरत देऊन पाणीटंचाई दूर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
देवगाव : गावाला पाणीपुरवठा करणार्या विहिरीची पाण्याची पातळी कमी झाल्याने आणि गावातील हातपंपाच्या पाण्याने तळ गाठल्याने पाण्याची टंचाई जाणवत असून ग्रामपंचायतीने नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा दिवसाआड केला आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तेव्हा गोदावरी डावा कालव्याचे आवर्तन त्विरत देऊन पाणीटंचाई दूर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
देवगावला सन १९८१ पासुन ग्रामपंचायत अहल्यादेवी कालीन बारवातून नळाद्वारे पाणीपुरवठा करत आहे. परंतु ज्या विहीरीतुन पाणीपुरवठा केला जातो. त्या विहिरीचे पाणी पावसाळा संपताच गावा जवळुन जाणार्या गोदावरी डाव्या कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून असते.
कालव्याला पाणी नसेल तर पाणीपुरवठा योजना कोलमडते. दरवर्षी होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने दोन विहिरी, गल्ली बोळात, खळयात- मळ्यात हातपंपही दिले आहेत. यापैकी दोनच हातपंप चालू आहेत, व तेही पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यात गोदावरी डाव्या कालव्यात पाणी असेल तर, आणि कालवा ओसरला की एक हंडाभर पाण्यासाठी महिलांची दमछाक होते.
पूर्वी गोदावरी डाव्या कालव्याचे दरमहा १५ ते २० दिवसांचे आवर्तन असायचे मागील काही वर्षांपासून कमी पडणारा पावसाळा आणि धरणातून मराठवाडा व जायकवाडी धरणाला जाणारे पाणी यामुळे आवर्तनाला उशीर होतो. आवर्तन सोडायचे की नाही हे वरून ठरत असल्यामुळे पाणी कालव्यात कधी येणार याचा कालवा अधिकार्यांनाही तपास नसतो. त्यामुळे गावाला पाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. परंतु कालव्यात पाणी असले तर पाण्याची रेलचेल असते. ही पाण्याची विपुलता पाहून पाणीटंचाई ग्रस्त गावे देवगावचा हेवा करतात.
गावाला लागून असणारा दुथडी वाहणारा गोदावरी कालवा व नांदूर मधमेश्वर जलद कालवा, रानोमाळ विहिरींना भरपूर पाणी, पाण्यामुळे शेतात डोलणारी हिरवीगार पिके हे पाहून इतरांना हेवा वाटणे सहाजिकच आहे. परंतु पाण्याच्या विपुलतेचा आनंद पावसाळ्यात साधारण निम्मा हिवाळा आणि उन्हाळ्यात कालव्याला पाणी असेल तर उपभोगता येतो.
या वर्षी गावाला हिवाळ्याच्या मध्यापासून पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. आज गावाला दिवसाड पाणी पुरवठा होत आहे. आवर्तनाला उशीर झाला तर मात्र गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल आणि महिलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागेल.