सिन्नर तालुक्यात अकरा गावे, ५७ वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 06:59 PM2018-10-14T18:59:53+5:302018-10-14T19:00:27+5:30
सिन्नर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दररोज टॅँकरच्या ३८ खेपांद्वारे अकरा गावे व ५७ वाड्या-वस्त्यांना पाणी पुरवठा केला जात आहे. दिवसेंदिवस तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. नव्याने टॅँकर सुरू करण्यासाठी तालुक्यातील ३६ वाड्या-वस्त्यांचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्राप्त झाले आहे.
सिन्नर : तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दररोज टॅँकरच्या ३८ खेपांद्वारे अकरा गावे व ५७ वाड्या-वस्त्यांना पाणी पुरवठा केला जात आहे. दिवसेंदिवस तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. नव्याने टॅँकर सुरू करण्यासाठी तालुक्यातील ३६ वाड्या-वस्त्यांचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्राप्त झाले आहे.
तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अल्प राहिल्याने सर्वत्रच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. संपुर्ण पावसाळ्यात तालुक्यात ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अत्यल्प पावसामुळे खरीपाचे पिके वाया गेली आहे. तसेच रब्बी हंगामाच्या आशा धसूर झाल्या आहेत. तालुक्यात अत्यल्प पावसाचे प्रमाण व गंभीर दुष्काळी परिस्थिती या दोन्ही निकषात तालुक्याचा समावेश झाल्यानंतर आता पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी दुष्काळी सत्यमापन चाचणीस प्रारंभ झाला आहे. त्यानुसार तालुक्यातील १३ गावांची निवड करण्यात आली असून तेथे पीक नुकसानीची खातरजमा करून पाहणीचे काम महसूल यंत्रणेमार्फत सुरू आहे. सध्या पडत असलेल्या कडक उन्हाने ग्रामीण भागातील विहिरींची पाणी पातळी खालवली आहे. नद्या-नाले, पाझर तलाव, सिमेंट बंधारे व गावतळे पावसाच्या पाण्याअभावी कोरडेठाक आहेत.
तालुक्यातील यशवंत नगर, धोंडवीरनगर, सुळेवाडी, गुळवंच, निºहाळे-फत्तेपूर, पाटपिंप्री, सोनारी, बारागाव पिंप्री, आशापूर (घोटेवाडी), फर्दापूर व फुलेनगर येथील जलस्त्रोत आटल्याने या गावांना दररोज टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच विविध गावांतील सुमारे ५७ वाड्या-वस्त्यांना टॅँकर सुरू करण्यात आले आहे. गाव व वाड्यांच्या लोकसंख्येनुसार टॅँकर खेपांचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या गावांचे व वाड्या-वस्त्यांचे टॅँकर मागणीसाठी प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्राप्त होतात. त्यानंतर गटविकास अधिकारी, तहसीलदार, उपअभियंता लघुपाटबंधारे विभाग हे स्व:ता टंचाईग्रस्त गावांना भेटी देवून पाहणी करतात. त्यानंतर टॅँकरचा प्रस्ताव उपविभागीय कार्यालय निफाड व त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला जातो. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर टॅँकर सुरू केला जात असल्याची माहिती पंचायत समितीच्या लघुपाटबंधारे विभागाने दिली.
तालुक्यातील नव्याने ३६ वाड्या-वस्त्या व डुबेरे या गावाचा प्रस्ताव टॅँकर मागणीसाठी प्राप्त झाल्याची माहिती लघुपाटबंधारे विभागाने दिली आहे. काही प्रस्ताव निफाड व नाशिक येथे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. मंजुरी मिळताच टॅँकर सुरू केले जाणार असल्याची माहिती पंचायत समिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
ग्रामसेवकांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना
तालुक्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर येथील पंचायत समिती कार्यालयात आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत गत आठवड्यात आढावा बैठक पार पडली. टंचाई आढावा बैठकीच्या प्रारंभी आमदार वाजे यांनी तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांकडून गावोगावची सद्यस्थिती व भविष्यात निर्माण होणारी स्थिती याची माहिती जाणून घेतली. अनेक ग्रामसेवकांनी संभाव्य स्थिती लक्षात घेऊन टॅँकरची गरज भासणार असल्याचे यावेळी बैठकीत सांगितले. तर काही ग्रामसेवकांनी टॅँकरच्या फेºया वाढवून मागितल्या. ज्या ग्रामपंचायतींचे अजून टॅँकर मागणीचे प्रस्ताव पाठविणे बाकी असून अशा ग्रामसेवकांनी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आमदार वाजे यांनी आढावा बैठकीत दिल्या आहे.