उद्या पंचवटीतील अनेक भागात पाणी पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 10:34 PM2021-02-09T22:34:22+5:302021-02-10T00:56:32+5:30

नाशिक- पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील दुर्गानगर व मखमलाबाद जलकुंभास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीला गळती लागल्याने ती दुरूस्त करण्याचे काम गुरूवारी (दि.११) करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी पंचवटीतील बहुतांश भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

Water supply to many parts of Panchavati will be cut off tomorrow | उद्या पंचवटीतील अनेक भागात पाणी पुरवठा बंद

उद्या पंचवटीतील अनेक भागात पाणी पुरवठा बंद

googlenewsNext
ठळक मुद्देगुरूवारी (दि.११) दुपारी व व सायंकाळी पाणी पुरवठा होणार नाही.

नाशिक- पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील दुर्गानगर व मखमलाबाद जलकुंभास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीला गळती लागल्याने ती दुरूस्त करण्याचे काम गुरूवारी (दि.११) करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी पंचवटीतील बहुतांश भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

पंचवटीतील दुर्गानगर व मखमलाबाद जलकुंभावरुन प्रभाग क्रमांक एक मधील शिवतेज नगर (पै.), श्रीधर कॉलनी (पै),तसेच प्रभाग क्रमांक६ चांदशी रोड, गंगावाडी रोड, फडोळ मळा, रामकृष्ण नगर, पिंगळे नगर, एरिकेशन कॉलनी, मानकर नगर, महालक्ष्मी नगर, स्वामी विवेकानंद नगर, मानकर मळा, तवली डोंगर परिसर, कल्याणी व राजेय सोसा, मेहेरधाम, गॅसगोडावून, यशोदानगर, पेठरोड या भाागात गुरूवारी (दि.११) दुपारी व व सायंकाळी पाणी पुरवठा होणार नाही.

त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक मधील दुर्गा नगर, शिव समर्थ नगर, जुई नगर, ओंकार बंगला परिसर शिवतेज नगर (पै.), श्रीधर कॉलनी (पै.) व प्रभाग क्रमांक ४ मधील कॅन्सर हॉस्पिटल मागील परिसर, अनुसयानगर, कर्णनगर, समर्थनगर व हमालवाडी परिसर, पवार मळा परिसर तसेच प्रभाग क्रमांक ६ मधील मखमलाबाद गांव, मखमलाबाद रोउ पश्चिम भाग, मातोश्री नगर, विद्या नगर, वडजाई माता नगर, महादेव कॉलनी, कोळी वाडा, घाडगे नगर, एरिकेशन कॉलनी (पै.), मानकर नगर (पै.), जयमल्हार कॉलनी, अश्वमेघ नगर, सप्तरंग सोसायटी इत्यादी परिसरात शुक्रवारी (दि.१२) सकाळी पाणीपुरवठा होणार नाही, असे महापालिकेने कळवले आहे.

Web Title: Water supply to many parts of Panchavati will be cut off tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.