जलवाहिनी दुरुस्तीनंतर ११ दिवसांनी पाणीपुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 08:31 PM2020-05-22T20:31:00+5:302020-05-22T23:43:09+5:30
सिन्नर : भोजापूर धरणातून मनेगाव १६ गावांसाठी राबवलेल्या पाणीपुरवठा योजनेची फुटलेली जलवाहिनी दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते राजाराम मुरकुटे आणि पाटोळेचे सरपंच मेघराज आव्हाड यांनी पुढाकार घेतल्याने मनेगावसह चार गावांचा पाणीपुरवठा गुरुवारी तब्बल ११ दिवसांनंतर सुरू झाला.

अकरा दिवसांपूर्वी अशाच प्रकारे जलवाहिनी फुटल्याने चारही गावांना ऐन उन्हाळ्यात आणि कोरोना साथीच्या काळात कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. राष्ट्रवादीचे नेते राजाराम मुरकुटे यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी जलवाहिनी दुरुस्तीसाठी पुढाकार घेतला. बुधवारी पाटोळेचे सरपंच मेघराज आव्हाड यांनी स्वत: या कामासाठी जेसीबी उपलब्ध करून दिला. दोघांनी स्थानिकांच्या मदतीने नादुरुस्त जलवाहिनी दुरुस्त करून चार गावांच्या पिण्याच्या पाणीप्रश्न मार्गी लावला. कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या चारही गावांना तब्बल ११ दिवसांनी पाणीपुरवठा झाल्याने येथील ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.