साकोरा येथील पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 11:42 PM2017-08-08T23:42:36+5:302017-08-09T00:15:46+5:30

गेल्या १५ दिवसांपूर्वी वीजपंप दोनवेळा जळाला तसेच पाइपलाइन फुटल्याने आता तर वीजपुरवठाच खंडित केल्याने गावाचा ऐन पावसाळ्यात पाणीपुरवठा बंद झाला असून, सरपंचाचा राजीनामा, ग्रामसेवकाची बदली आदी सर्व कारणांमुळे गावकºयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असतानादेखील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असून, केवळ राजकारण सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.

Water supply at Sakora is closed | साकोरा येथील पाणीपुरवठा बंद

साकोरा येथील पाणीपुरवठा बंद

Next

साकोरा : गेल्या १५ दिवसांपूर्वी वीजपंप दोनवेळा जळाला तसेच पाइपलाइन फुटल्याने आता तर वीजपुरवठाच खंडित केल्याने गावाचा ऐन पावसाळ्यात पाणीपुरवठा बंद झाला असून, सरपंचाचा राजीनामा, ग्रामसेवकाची बदली आदी सर्व कारणांमुळे गावकºयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असतानादेखील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असून, केवळ राजकारण सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.
गावाला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा या हेतूने ७० लाख रुपये खर्च करून जलस्वराज्य योजना सुरू करून ती ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतरदेखील तिच्या दुरुस्तीच्या नावाखाली अनेकवेळा थकीत वीजबिल न भरता लाखो रुपये खर्च करूनही ऐन पावसाळ्यातसुद्धा महिलांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आज दोन वर्षांनंतर सरपंच वैशाली झोडगे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने आज पद रिक्त आहे. ग्रामसेवक ए. बी. सोनवणे यांची बदली झाली आहे. त्यातच आता वितरण कंपनीने वीजबिल थकल्यामुळे सदर योजनेचा विद्युतपुरवठा खंडित केल्याने विहिरीत पाणी असूनही गेल्या दहा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. याबाबत ग्रामपंचायतीने अजूनही काही निर्णय घेतलेला नाही. सरपंच व ग्रामसेवक यांचे बँकेत संयुक्त खाते असून, आज दोघेही नसल्याने वितरण कंपनीला चेक द्यायचा कोणी, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. जर नवीन सरपंच होण्यासाठी महिना लागला तर गावाला महिन्यानंतर पाणी देणार का, असा संतप्त सवाल केला जात आहे. विशेष म्हणजे, सन २००७ पासून तर आजपर्यंतची ही थकबाकी असून, यावर ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यावेळी कोणाची सत्ता होती, त्यांनी वीजबिल का भरले नाही, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत आमची सत्ता आली असून, आम्ही पाच लाख रुपये भरले आहेत. त्यांच्या काळातील थकबाकी आम्ही कशी भरणार, असे उपसरपंच अतुल पाटील यांनी सांगितले; मात्र या संपूर्ण राजकारणात गावकºयांना नाहक पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. याबाबत नवीन ग्रामसेवक सरोदे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी आपल्या अडचणीचे कारण सांगून दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल.

Web Title: Water supply at Sakora is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.