पाणीपुरवठा योजनांना अडसर नियमांचा

By admin | Published: October 29, 2014 12:06 AM2014-10-29T00:06:36+5:302014-10-29T00:08:22+5:30

उपाध्यक्ष प्रकाश वडजेंनी अधिकाऱ्यांना सुनावले

Water supply schemes | पाणीपुरवठा योजनांना अडसर नियमांचा

पाणीपुरवठा योजनांना अडसर नियमांचा

Next

नाशिक : सरकारी कामात लालफितीचा अडसर प्रत्येक योजनांना आणि विकासकामांना येत असल्याचे वारंवार उघडकीस येत असले, तरी त्यावर तोडगा न काढताच संदिग्ध नियमांच्या आधारे कामे पुढे रेटण्याची घाई प्रशासनाच्या अंगलट येत असते. दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील पाणीपुरवठा योजनेबाबतही अशीच तांत्रिक अडचण आली असून, या प्रकरणी उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले.
दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत गावात पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून, ग्रामसभेने यासंदर्भात योजना राबविण्याचे अधिकार ग्रामस्वच्छता व पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व सचिवांना दिले आहेत. मात्र ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शासननिर्णयाचा आधार घेत गावातील योजना राबविण्याबाबतचे अधिकार सरपंच व ग्रामसेवक यांना देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित केली आहे.
त्यावेळी प्रकाश वडजे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून घेत याबाबत विचारणा केली. त्यावर अधिकाऱ्यांनी शासननिर्णयानुसार पाणीपुरवठा योजना राबविण्याचे अधिकार सरपंच व ग्रामसेवकांना असल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी वडजे यांनी जर योजना राबविण्याचे अधिकार सरपंचांना असतील तर मग जर निधीची अफरातफर झाल्यास ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या अध्यक्ष व सचिवांना जबाबदार धरणार की सरपंचांना, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी अधिकारी निरुत्तर झाले. ही तांत्रिक अडचण असून, याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन शासनाकडून मागवा, असे आदेश प्रकाश वडजे यांनी अधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Water supply schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.