बागलाण, मालेगाव तालुक्यातील साठ गावांना पाणीपुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:31 AM2018-08-01T00:31:04+5:302018-08-01T00:31:26+5:30

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत बागलाण व मालेगाव तालुक्यातील साठ गावांना सुमारे ७० कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत.

 Water supply schemes to the sixty villages of Baglan, Malegaon taluka | बागलाण, मालेगाव तालुक्यातील साठ गावांना पाणीपुरवठा योजना

बागलाण, मालेगाव तालुक्यातील साठ गावांना पाणीपुरवठा योजना

Next

सटाणा : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत बागलाण व मालेगाव तालुक्यातील साठ गावांना सुमारे ७० कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत.  मंजूर योजनांमध्ये बागलाणच्या तब्बल ५१ गावांचा समावेश आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत या कामांना प्रारंभ करण्यात येणार आहे. बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर कालव्याचे कामदेखील अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच हरणबारी डाव्या कालव्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.  बागलाण व मालेगाव तालुक्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या समवेत झालेल्या विशेष बैठकीत बागलाण तालुक्यासह मालेगाव तालुक्यातील बहुतांशी गावांचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करण्याचा प्रस्ताव आपण ठेवला होता. मुख्यमंत्र्यांसह राज्याचे पाणीपुरवठा मंत्री यांनी मुख्यमंत्री पेयजल योजनेत बागलाण तालुक्यातील ५१ गावांसह मालेगाव तालुक्यातील नऊ गावांचा समावेश केल्याचे डॉ. भामरे यांनी म्हटले आहे. १५ सप्टेंबरपर्यंत या कामांना सुरु वात होणार असून, लवकरच या सर्व कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.
या गावांना होणार फायदा
बागलाण तालुक्यातील अजमीर सौंदाणे, अलियाबाद, औंदाणे, आव्हाटी, भाक्षी, भिलवाड, जामनेस पाडा, बिजोटे, बिलपुरी, हनुमंत पाडा, कांद्याचा मळा,बोºहाटे, राहूड, चौंधाणे, दह्याणे, देवठाण, गोराणे, जोरण, कºहे, केळझर, खमताणे, खिरमाणे, मळगाव, भामेर, मुल्हेर, पिंपळदर, पिंपळकोठे, पिंगळवाडे, रामतीर, रातीर, भंडारपाडे, भाटांबा, भिकारसोंडा,भोकरपाडा, धुखीपाडा, ताहाराबाद, तांदूळवाडी, तरसाळी, कोपमल, वीरगाव, वाघळे व मालेगाव तालुक्यातील अस्ताणे, चिंचगव्हाण, ढवळेश्वर, निमशेवडी, पाडळदे, पांढरूण, वडनेर, वºहाणे व वºहाणेपाडा या गावांचा व पाड्यांचा समावेश करण्यात आला.
बागलाण, मालेगाव तालुक्यातील जलसिंचन प्रश्नासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आहे. सटाणा शहराचा पाणीप्रश्न, तळवाडे भामेर एक्स्प्रेस कालवा, हरणबारी डावा कालव्यासह, साक्र ी-शिर्डी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आणि तब्बल ५१ गावांचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करण्यात आपल्याला यश आले आहे. निवडणुकीदरम्यान दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यात आपल्याला यश आले आहे.
- डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री

Web Title:  Water supply schemes to the sixty villages of Baglan, Malegaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी