दलित वस्ती सुधार योजनेतीलपाणीपुरवठ्याची कामे प्राधान्यक्रमावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:23 AM2018-11-02T00:23:48+5:302018-11-02T00:27:07+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांपैकी दलित वस्ती सुधार योजनांवर अधिक लक्ष केंद्रित करून या योजनांमधील कामांची गुणवत्ता राखण्याबरोबरच दुष्काळी परिस्थितीचा विचार करता या ठिकाणी प्राधान्याने पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिल्या.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांपैकी दलित वस्ती सुधार योजनांवर अधिक लक्ष केंद्रित करून या योजनांमधील कामांची गुणवत्ता राखण्याबरोबरच दुष्काळी परिस्थितीचा विचार करता या ठिकाणी प्राधान्याने पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीची सभा सभापती चारोस्कर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी त्यांनी समाजकल्याण विभागाकडून राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती घेतली. अपूर्ण कामांचा तपशील आणि कामांना होणाºया विलंबाबतही त्यांनी अधिकाºयांना माहिती सादर करण्याचे आदेश दिले. समाजकल्याण विभागामार्फत वृद्ध कलावंत मानधन योजना राबविली जाते. या योजनेचा आढावा घेताना प्रलंबित मानधन आणि मानधनाचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले. आंतरजातीय विवाह योजना व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी वस्तीचा विकास करणे, तांडावस्ती अपंग बीज भांडवल, अपंग शिष्यवृत्ती, शालेय शिष्यवृत्ती योजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत एकूण ३६.११ कोटींचे ९१६ प्रस्ताव प्राप्त झालेले असून, प्रस्तावांची छाननी झाल्यानंतर सदर परिपूर्ण असलेल्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे. सदर बैठकीमध्ये नाशिक जिल्ह्णात दुष्काळाचे सावट असल्याने दलित वस्ती सुधार योजनेत दुष्काळी परिस्थितीचा विचार करता पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला.
नाशिक तालुक्यातील गणेशगाव येथील रस्ता कॉँक्रिटीकरण करणे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार हिरामण खोसकर यांनी केली. या कामांच्या चौकशीची मागणी त्यांनी केली.
या बैठकीस हिरामण खोसकर, सुरेश कमानकर, यशवंत शिरसाठ, रमेश बरफ, कन्हू गायकवाड, विद्या पाटील, शोभा कडाळे उपस्थित होते. दर्जा राखण्याची सूचनादलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मंजूर असलेल्या कामांची गुणवत्ता व कामांची तपासणी होत नसल्यामुळे अनेक कामांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे केलेल्या कामांचा लवकर बोजवारा उडतो आणि केलेल्या कामांचा लाभदेखील होत नाही. त्यामुळे समाजकल्याण विभागामार्फत होणाºया कामांचा दर्जा राखला जावा, अशी सूचना चारोस्कर यांनी यावेळी केली.