पाणी फाऊंडेशनची जलचळवळ अखंड सुरू रहावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 06:59 PM2018-08-10T18:59:41+5:302018-08-10T18:59:58+5:30

सिन्नर : तालुक्याचा दुष्काळ हटविण्यासाठी पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत कोणताही भेदभाव मनात न ठेवता जलमित्रांनी एकदिलाने काम केले आहे.

Water supply should continue continuously | पाणी फाऊंडेशनची जलचळवळ अखंड सुरू रहावी

पाणी फाऊंडेशनची जलचळवळ अखंड सुरू रहावी

Next

सिन्नर : तालुक्याचा दुष्काळ हटविण्यासाठी पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत कोणताही भेदभाव मनात न ठेवता जलमित्रांनी एकदिलाने काम केले आहे. पानी फाऊंडेशनने सुरु केलेली ही जलचळवळ अखंड सुरु रहावी तसेच पाण्याचे मोल ओळखून तालुक्यातील सर्वच गावांनी पुढील वर्षी होणाऱ्या वॉटर कप २०१९ च्या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात पानी फाउंडेशनच्या वतीने २०१८ च्या वॉटर कप स्पर्धेत सक्रीय सहभाग घेऊन जलसंधारणाचे काम उभे करणाºया तालुक्यातील सात गावांसह जलमित्रांचा गौरव यावेळी करण्यात आला. व्यासपीठावर शिवसेना युवा नेते उदय सांगळे, पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ भाबड, तहसीलदार नितीन गवळी, सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, नासाकाचे माजी संचालक अशोक डावरे आदी उपस्थित होते. आमदार वाजे म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमाने युवा मित्र संस्थेसह आपण यापुर्वीच जलचळवळीत सहभाग घेतला. मात्र पानी फाउंडेशनच्या कामाने काम करण्याची उर्जा मिळाली. कोनांबे गावाच्या उशाला धरण असताना देखील या गावच्या ग्रामस्थांना पाण्याची किंमत कळाली. त्यामुळे त्यांनी स्पर्धेत सक्रीय सहभाग घेऊन मोठी जलचळवळ उभारली. त्यामानाने पूर्व भागातील गावांना पाण्याची गरज असताना त्यांनी स्पर्धेतून माघार घेतल्याने आमदार वाजे यांनी खंत व्यक्त केली.
पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून तालुक्याने यंदा अंदाजे १५ लाख क्युबिक मीटरचे जलसंधारणाचे काम केले असल्याची माहिती सहाय्यक गटविकास अधिकारी पगार यांनी दिली. पहिले वर्ष असल्याने प्रशासन थोडे कमी पडले असेल, मात्र पुढच्या वर्षीची तयारी आम्ही १५ आॅगस्टच्या ग्रामसभेपासूनच करणार असल्याचे त्यांनी सांगितले. उदय सांगळे यांनी स्पर्धेच्या माध्यमाने जलसंधारणाची कामे करून पाणी साठविण्यासाठी भांडे तयार केले आहे. आता पुरेशा पावसाची प्रतीक्षा असल्याचे नमूद केले. सात गावांनी अतिशय उत्कृष्ट काम केले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी सर्व सहभागी गावे व घटकांना जलरत्न म्हणून गौरविण्यात आले. या उपक्र मात सहभागी घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा गौरव करण्यात आल्याचे अशोक बरुंगले यांनी सांगितले. यावेळी रामपूर, पाटपिंप्री, कोनांबे, हरसुले, वडझिरे, धोंडबार, औंढेवाडी आदी गावचे ग्रामस्थ, तसेच व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था, एस. एस. के. पब्लिक स्कूल, मविप्रचे विद्यार्थी, बीजेएसचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्र म यशस्वीतेसाठी पानी फाउंडेशनचे तालुका समन्वयक अशोक भांडकोळी, अशोक बुरुंगले, नवनाथ बढे, सुनीता पाटणे, विजय कोळी आदींनी परिश्रम घेतले.

फोटो क्र.- 10२्रल्लस्रँ01
फोटो ओळी- सिन्नर येथील पंचायत समितीच्या सभागृहात पाणी फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील जलमित्रांना जलरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले. त्याप्रसंगी आमदार राजाभाऊ वाजे, उपसभापती जगन्नाथ भाबड. समवेत उदय सांगळे, नितीन गवळी, रत्नाकर पगार, अशोक डावरे, अशोक भांडकोळी, अशोक बुरुंगले आदि.

Web Title: Water supply should continue continuously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी