पाणीपुरवठ्याचे सोशल आॅडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2015 11:44 PM2015-12-31T23:44:45+5:302015-12-31T23:45:44+5:30
उद्यापासून सुरुवात : चोवीस तासांत करणार ९४ जलकुंभांची तपासणी
नाशिक : गंगापूर धरणातील अल्प पाणीसाठ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी मुकाबला करतानाच भविष्यातील नियोजनासाठी महापालिकेने आता शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे सोशल आॅडिट करण्याचा निर्णय घेतला असून, शनिवार, दि. २ ते रविवार दि. ३ जानेवारी २०१६ या चोवीस तासांच्या कालावधीत ९४ जलकुंभांच्या ठिकाणी प्रत्यक्षात पाणीपुरवठ्याचे मोजमाप केले जाणार आहे. या मोजमापासाठी शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसह लोकप्रतिनिधी व नागरिकांचे सहकार्य घेतले जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांनी दिली.
मागील महिन्यात झालेल्या महासभेत पाणीप्रश्नी चर्चा होऊन आयुक्तांनी पाणीपुरवठ्याचे सोशल आॅडिट करण्याचे जाहीर केले होते.