मेहबूबनगर येथे टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 01:41 AM2019-05-14T01:41:34+5:302019-05-14T01:41:50+5:30
वडाळागावातील मेहबूबनगर परिसरात अत्यंत कमी व कमी वेळेत होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे महिलावर्गास कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच काही भागात तर पाणीपुरवठा होत नसल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.
इंदिरानगर : वडाळागावातील मेहबूबनगर परिसरात अत्यंत कमी व कमी वेळेत होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे महिलावर्गास कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच काही भागात तर पाणीपुरवठा होत नसल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.
वडाळागावातील मेहबूबनगर, गुलशननगर, सादिकनगर, मुमताजनगर, मदारनगर यांसह परिसरात सुमारे सहा हजार लोकांची वस्ती आहे. यामध्ये बहुतेक हातावर काम करणाऱ्यांची वस्ती म्हणून ओळखली जाते. सुमारे चार महिन्यांपासून या परिसरात अत्यंत कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा होत आहे. तसेच काही भागात पाणीपुरवठा होत नसल्याचे महिला वर्गाने तक्र ार केली आहे. ऐन उन्हाळ्यात महिलावर्गाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
पाणीपुरवठा विभागात तक्रार करूनसुद्धा कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वणवण भटकंती
वडाळागावातील परिसरात बहुतेक मुस्लीम वस्ती असल्याने रमजानचे उपवास सुरू असून, ऐन उन्हाळ्यात महिलावर्गात पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. परिसरातील दहा ते पंधरा कुटुंबे एकत्र येऊन पैसे गोळा करून पाण्याचा टँकर मागवत आहे.