ग्रामपंचायकडून टॅँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 06:04 PM2019-05-05T18:04:30+5:302019-05-05T18:04:44+5:30
सिन्नर : तालुक्यातल्या नांदूरशिंगोटे येथील वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सिन्नर : तालुक्यातल्या नांदूरशिंगोटे येथील वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेत नांदूरशिंगोटे गावाचा समावेश आहे. त्यामुळे गावात व काही वस्त्यांवर दिवसाआड नळपाणी पुरवठा होत आहे. परंतु काही ठिकाणी पाणीयोजनेचे पाणी न गेल्याने दरवर्षी तेथे उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र पाणी टंचाई जाणवते. गेल्या काही महिन्यांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने वाड्या-वस्त्यांवरील विहीरींनी तळ गाठला आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाझरतलाव, केटीवेअर बंधारे, सार्वजनिक विहीरी कोरड्याठाक पडल्या आहेत. त्यामुळे वाड्या-वस्त्यांवरील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता गंभीर होत आहे. येथील वाड्या-वस्त्यांवर पाणी टंचाई निवारण्यासाठी शासनाकडून दोन टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पंरतू दिवसेंदिवस खालवत चाललेली पाणी पातळी, बाष्पीभवन, वाढती लोकसंख्या अशा अनेक कारणांमुळे शासनाने मंजूर केलेले टॅँकरचे पाणी कमी पडत होते. त्यामुळे वाड्या-वस्त्यांवर महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.