बारागावपिंप्री, पाटपिंप्री, सुळेवाडीत टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 05:57 PM2019-05-04T17:57:10+5:302019-05-04T17:57:27+5:30

सिन्नर : आर्ट आॅफ लिव्हींग संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील बारागाव पिंप्री, पाटपिंप्री, सुळेवाडी आदी गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.

Water supply through Baragaon Pimpri, Patpippree, Sulewadi tanker | बारागावपिंप्री, पाटपिंप्री, सुळेवाडीत टॅँकरने पाणीपुरवठा

बारागावपिंप्री, पाटपिंप्री, सुळेवाडीत टॅँकरने पाणीपुरवठा

Next

सिन्नर : आर्ट आॅफ लिव्हींग संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील बारागाव पिंप्री, पाटपिंप्री, सुळेवाडी आदी गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.
बारागाव पिंप्री येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मान्यवरांच्या हस्ते टॅँकरद्वारे पाणी वाटप करून प्रातिनिधिक स्वरूपात या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. संस्थेच्या या योगदानामुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी आर्ट आॅफ लिव्हिंगचे सहाणे यांनी मनोगत व्यक्त केले. पाटील यांनी ध्यान व मार्गदर्शन केले. आत्माराम उगले यांनी प्रास्तविक केल. दशरथ रोडे यांनी सूत्रसंचालन केले. पाणी पुरवठ्यासाठी अमोल उगले, हनुमंता कुºहाडे, सुरेश उगले यांनी टॅँकर उपलब्ध करून दिला. ग्रामस्थांच्या वतीने पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाणके, बारागाव पिंप्रीचे सरपंच योगेश गोराडे, पाटपिंप्री ग्रामपंचायत सदस्य प्रकाश उगले, भाऊसाहेब ताकाटे, सुळेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते नितीन डावखर, रवी गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्य दत्तू उगले, गोरख जाधव, सागर उगले, विजय कटके, अरूण खंडोदे, भीमाजी उगले, रतन उगले, अनिल उगले, वसंत शहाणे, मनोज उगले, कैलास उगले, सुनील उगले, दत्ता राजगुरू, मारूती उगले, कचरू घोडे, बाळू उगले, दत्तू उगले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Water supply through Baragaon Pimpri, Patpippree, Sulewadi tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी