योजना बंद असल्याने स्वखर्चाने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा
By admin | Published: March 7, 2017 12:37 AM2017-03-07T00:37:58+5:302017-03-07T00:38:07+5:30
सिन्नर : गेल्या पंधरा दिवसांपासून वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा बंद असल्याने योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना तीव्र टंचाई जाणवत आहे.
सिन्नर : गेल्या पंधरा दिवसांपासून वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा बंद असल्याने योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना तीव्र टंचाई जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर भरतपूर गणाच्या नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य योगीता बाबासाहेब कांदळकर यांनी स्वखर्चाने मिठसागरे गावास पिण्याच्या पाण्याचा टॅँकर सुरु केला.
वीजबिलाची थकबाकी असल्याने वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना तीव्र टंचाईची झळ बसू लागली आहे. मिठसागरे गावास अन्यत्र पाण्याचा स्रोत नसल्याने याठिकाणी टंचाईची तीव्रता सर्वाधिक आहे.
मिठसागरे ग्रामस्थांची पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी होणारी वणवण विचारात घेऊन नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य योगीता कांदळकर यांनी स्वखर्चाने रविवारपासून मिठसागरे गावासाठी पिण्याच्या पाण्याचा टॅँकर सुरू केला आहे. पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र घुमरे यांच्या उपस्थितीत या टॅँकरद्वारे पाण्याचे वितरण सुरु करण्यात आले. यावेळी आनंदा कांदळकर, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब कांदळकर, नाना कासार, प्रदीप तनपुरे, सोमनाथ कासार, बाळासाहेब साळुंके, संजय दिवेकर, संदीप कासार, गोरख चतुर, मधुकर फापाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)