उंबरदरी धरणातून पाणीचोरी सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 10:32 PM2019-04-04T22:32:27+5:302019-04-04T22:41:46+5:30
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील उंबरदरी धरणातून होत असलेल्या पाणीचोरीबाबत पाटबंधारे विभागाच्या वतीने पंधरा दिवसांमध्ये दोन वेळेस रात्रीच्या वेळी धाड टाकून सुरू असणारे विद्युतपंप जप्त करण्यात आले आहे.
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील उंबरदरी धरणातून होत असलेल्या पाणीचोरीबाबत पाटबंधारे विभागाच्या वतीने पंधरा दिवसांमध्ये दोन वेळेस रात्रीच्या वेळी धाड टाकून सुरू असणारे विद्युतपंप जप्त करण्यात आले आहे.
उंबरदरी धरणातून पाणीचोरी होत असल्याने नाशिक येथील पाटबंधारे विभागाच्या वतीने बुधवारी मध्यरात्री धाड टाकून सुरू असणारे विद्युतपंप जमा करण्यात आले आहे. उंबरदरी धरणावर प्रादेशिक जीवन प्राधिकरणाची ठाणगावसह पाचगाव पाणीपुरवठा ही योजना अवलंबून आहे. धरणाची क्षमताही ५२ दशलक्ष घनफूट एवढी आहे. धरण साठ्यातही वाढ झाली असून, चालू वर्षी पावसाचे प्रमाण कमी असूनही धरण ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पाणी उपसा करण्याची परवानगी मिळविलेली आहे अशा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत पाणी उपसा केला. त्यानंतर त्यांना पाटबंधारे विभागाच्या वतीने नोटीस बजावण्यात आली. पाणी चोरणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणीधरणातून ठाणगावसह पाचगाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असून, पाणीचोरी होत राहिली तर ठाणगावसह सहभागी या पाचही गावांना पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होणार आहे. ठाणगावसह पाडळी, टेंभूरवाडी
( आशापूर ), हिवरे , पिंपळे आदी वाड्या-वस्त्यांचा या योजनेत समावेश आहे. या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बारामाही सध्या तरी सुटलेला आहे. धरणातील पाणीही खूप मोठ्या प्रमाणात कमी झाले असून, पाटबंधारे विभागाच्या वतीने जर या पाणीचोरी करणाºयांवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.