कोळगावमाळ येथे सरपंचांकडून गावाला टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 05:10 PM2019-05-23T17:10:01+5:302019-05-23T17:10:15+5:30

पाथरे : सिन्नर तालुक्यातील कोळगावमाळ येथे सरपंच ललिता कुमावत आणि ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती (बंडोपंत) कुमावत यांनी स्वखर्चाने गावाला टॅँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.

Water supply from village Sarpanch to tanker at Kolgaonal | कोळगावमाळ येथे सरपंचांकडून गावाला टॅँकरने पाणीपुरवठा

कोळगावमाळ येथे सरपंचांकडून गावाला टॅँकरने पाणीपुरवठा

googlenewsNext

पाथरे : सिन्नर तालुक्यातील कोळगावमाळ येथे सरपंच ललिता कुमावत आणि ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती (बंडोपंत) कुमावत यांनी स्वखर्चाने गावाला टॅँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.
सद्या सगळीकडे तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. मात्र कोळगावमाळ गावास पाणी टंचाईचा सामना अद्याप पर्यंत करावा लागला नव्हता. कारण गावाजवळून नांदूर-मध्यमेश्वरचा उजवा कालवा जातो. कालव्याला येणाऱ्या पाण्याच्या आवर्तनामुळे कोळगावास मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होत असे. परंतु यावर्षी उन्हाळ्यात गावात तीव्र पाणी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच पुरेशा वीजपुरवठा अभावी कोळगावमाळ येथे निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सरपंच सौ. ललिता कुमावत पुढे सरसावल्या असून त्यांनी पती निवृत्ती कुमावत यांच्या मदतीने गावाला मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. परिसरात दिवसभरात फक्त दोन तास थ्री फेज वीज पुरवठा केला जातो त्यामुळे पाण्याची टाकी भरत नाही परिणामी गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच प्राणी, पशु, माणसे यांना पाण्याची तीव्र गरज भासू लागली आहे. हे चित्र येथील ग्रामपंचायत सरपंच ललिता कुमावत आणि त्यांचे पती सदस्य निवृत्ती कुमावत यांच्या लक्षात आले. तालुका प्रशासन गावास पाणीपुरवठा करेल या विचारात बसण्यापेक्षा त्यांनी स्वत: स्वखर्चाने गावास पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. सरपंच म्हणून आपली जबाबदारी आहे की गावाला मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करणे आणि त्याअनुषंगाने कुमावत कुटूंबाने स्वखर्चाने ही जबाबदारी स्वीकारली आहे. दिवसभरात टँकरने दोन ते तीन खेपा करून गावाची तहान भागवण्याचे काम कुमावत करत आहे. एका टँकरच्या फेरीसाठी साधारण एक ते दीडहजार रूपये इतका खर्च लागत आहे. गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये यासाठी मी व माझ्या कुटूंबाने हा उपक्रम हाती घेतला असल्याचे कुमावत यांनी सांगितले.

Web Title: Water supply from village Sarpanch to tanker at Kolgaonal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी