पाणी टॅँकर खेपांच्या तपासणीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:30 AM2019-05-10T00:30:30+5:302019-05-10T00:35:14+5:30

नाशिक : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा करणाºया पाणी टॅँकरवर लावण्यात आलेल्या जीपीएस यंत्रणेच्या हाताळणीबाबत प्रांत, तहसीलदार, गटविकास अधिकारी अनभिज्ञ असल्याचे टंचाई आढावा बैठकीत स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणाºया टॅँकरच्या खेपा किती होतात व इच्छितस्थळी पाणी पोहोचते काय याची तत्काळ तपासणी करण्यात यावी, त्यात गैरप्रकार आढळल्यास संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Water Tanker Consignment Orders | पाणी टॅँकर खेपांच्या तपासणीचे आदेश

टॅँकर मंजूर करताना त्या गावातील लोकसंख्येची वास्तवता लक्षात घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या.

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा : जीपीएस यंत्रणेविषयी अधिकारी अनभिज्ञ

नाशिक : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा करणाºया पाणी टॅँकरवर लावण्यात आलेल्या जीपीएस यंत्रणेच्या हाताळणीबाबत प्रांत, तहसीलदार, गटविकास अधिकारी अनभिज्ञ असल्याचे टंचाई आढावा बैठकीत स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणाºया टॅँकरच्या खेपा किती होतात व इच्छितस्थळी पाणी पोहोचते काय याची तत्काळ तपासणी करण्यात यावी, त्यात गैरप्रकार आढळल्यास संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, जिल्हा परिषद, वीज कंपनी, पाटबंधारे, पशुसंवर्धन आदी खात्यांच्या अधिकाºयांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी मांढरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्यात पाणीटंचाई, चाºयाची परिस्थिती, रोजगार हमी योजनेची कामे, चारा छावण्या या चार मुद्द्यांवर तालुकानिहाय सूक्ष्म आढावा घेण्यात आला. तालुक्यातील टंचाईची परिस्थिती, मंजूर टॅँकर, त्याच्या खेपा, पर्यायी व्यवस्था याची माहिती घेताना मालेगाव व अन्य एका तालुक्यात मंजूर टॅँकरपेक्षाही कमी टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे अधिकाºयानेच कबूल केले. त्यावर जिल्हाधिकाºयांनी टॅँकरवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली असून, त्याद्वारे त्यावर लक्ष ठेवणे अपेक्षित असताना किती अधिकाºयांना त्याची कल्पना आहे, अशी विचारणा करताच अधिकाºयांनी नकारार्थी उत्तर दिले. टॅँकरची मुख्य जबाबदारी असलेले ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंतादेखील अनभिज्ञ असल्याचे पाहून जिल्हाधिकाºयांनी सर्वच अधिकाºयांना धारेवर धरले. प्रांत, तहसीलदार, गटविकास अधिकाºयांनी उद्यापासून जीपीएस यंत्रणेची माहिती अद्ययावत करावी, आपण कोणत्याही क्षणी कोणत्याही अधिकाºयाला विचारणा करू त्यावेळी त्यांनी भ्रमणध्वनीवर पुराव्यानिशी माहिती द्यावी, असे आदेश दिले. याकामी हलगर्जीपणा करणाºया अधिकाºयावर प्रसंगी कारवाईही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर टॅँकरच्या खेपा तपासण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या. ग्रामीण भागात पाणी साठवण्याची साधने नसल्यामुळे धोकादायक विहिरीत टॅँकरद्वारे पाणी टाकले जाते ते टाळण्यासाठी येत्या दोन दिवसांत जिल्हा परिषदेच्या बाराव्या वित्त आयोगातून नवीन टाक्या खरेदी करण्यात येणार असून, त्या टाक्यांमध्येच पाणी टाकले जावे याची दक्षता घेण्याचे व त्याबाबत टॅँकरचालकास कल्पना देण्यात यावी, असेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
टॅँकरसाठी पाणीपुरवठा करणाºया जलस्रोतांवर लक्ष ठेवण्याबरोबच अधिग्रहीत करण्यात आलेल्या खासगी विहिरीचा मालक अन्य दुसºया व्यक्तींना पाणीविक्री करीत नसेल कशावरून असा प्रश्नही जिल्हाधिकाºयांनी विचारला. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोणती यंत्रणा आहे अशी विचारणा त्यांनी केली, परंतु तशी व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्याचबरोबर धरणे, तलाव, कॅनॉल, नदी, नाल्यांमधील पाण्याची चोरी रोखण्यासाठी पथके तयार करण्याचे व पाणीचोरी करणाºयांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाºयांनी दिले.
रोहयो कामांची माहिती
ग्रा.पं.च्या फलकावर
दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागातून रोहयोच्या कामांची मागणी होऊ शकते हे विचारात घेऊन सेल्फवर अनेक कामे मंजूर करून ठेवण्यात आले आहेत. मागेल त्याला काम देण्याची तयारी असल्याने प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीच्या फलकावर कामाची माहिती लावण्यात येईल असे सांगून, जिल्हाधिकाºयांनी रोहयो कामे मंजूर करताना प्रत्येक गावाला समान कामे केली जावीत, मोजक्याच गावांमध्ये कामे असू नयेत, असेही त्यांनी सांगितले. छावण्यांसाठी जागा, पाण्याची व्यवस्थाया बैठकीत जिल्हाधिकाºयांनी सर्व अधिकाºयांना चारा छावण्यांची तयारी करण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी गावांमध्ये शासकीय जागा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे किंवा नाही याची पाहणी करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्णात सात ते आठ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध असून, दिवसाला दोन हजार मेट्रिक टन चाºयाची मागणी आहे. सदरच्या चाºयाची कशी वाहतूक करणार याबाबतही त्यांनी आढावा घेतला. जिल्ह्णात चारा छावणीचे पाच प्रस्ताव दाखल झाले असून, त्यांना लवकरच मंजुरी दिली जाईल, त्याचबरोबर डेपो सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. २४ तासांत टॅँकरची मागणी पूर्णजिल्ह्यातील धरणांमध्ये जुलैअखेर पुरेल इतका पाणी साठा असून, तरीही ज्या भागात पाणी नाही अशा ठिकाणी टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची तयारी असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. मागणी केल्यास वास्तवता तपासून २४ तासांत टॅँकर मंजूर करण्यात येईल. टॅँकर मंजूर करताना त्या गावातील लोकसंख्येची वास्तवता लक्षात घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या.

Web Title: Water Tanker Consignment Orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.