पंधरा वर्षांपासून टॅँकरचेच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:35 AM2019-05-18T00:35:33+5:302019-05-18T00:36:31+5:30

नांदगाव तालुक्यातील मोरझर गावाची लोकसंख्या जेमतेम ११००. गेल्या पंधरा वर्षांपासून ग्रामस्थांची तहान टँकरच भागवित आहे. अशी या गावाची कथा. घरातील प्रत्येकाने हंडा किंवा बादली भरून पाणी आणून देणे हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.

 Water tanker for fifteen years | पंधरा वर्षांपासून टॅँकरचेच पाणी

पंधरा वर्षांपासून टॅँकरचेच पाणी

Next

नांदगाव : स्थळ : मोरझर, वेळ : सकाळी १० वाजल्याची..
डोक्यावर हंडा ठेवून महिला पाण्यासाठी निघाल्या. कोणाच्या पायात रबरी चप्पल, फाटके पायताण, तर काही अनवाणी. तापलेल्या जमिनीचे चटके पायांना बसताहेत, तर वरून सूर्य आग ओकतो आहे.
नांदगाव तालुक्यातील मोरझर गावाची लोकसंख्या जेमतेम ११००. गेल्या पंधरा वर्षांपासून ग्रामस्थांची तहान टँकरच भागवित आहे. अशी या गावाची कथा. घरातील प्रत्येकाने हंडा किंवा बादली भरून पाणी आणून देणे हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. येथील महिलांचे आयुष्य केवळ पाणी आणि पाणी या समस्येनेच व्यापलेले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तीच काळजी व तोच उद्योग. पाणी आणणे.. पाणी आणणे... पाण्यासाठीसुद्धा टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
गावात जलस्रोतच नसल्याने अडथळे
मोरझर गावाची लोकसंख्या साधारणत: ११०० असून, आर्थिक स्तर जेमतेमच आहे. गावात पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नाही. एक सार्वजनिक विहीर आणि हातपंप असून, त्यालाही पाऊस बरा पडला तरच पाणी येते. गाव परिसरात कोणताही कायमस्वरुपी जलस्रोत नसल्याने गावात कोणतीही पाणीपुरवठा योजना होऊ शकलेली नाही. या गावाला टँकरशिवाय पर्याय उपलब्ध नाही.
चारा छावणी नसल्याने गंभीर स्थिती
गावात पाणीटंचाई पाचवीला पूजलेली. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर. चाराटंचाईमुळे शेतकऱ्यांना आपली लाडकी जनावरे मातीमोल भावात विकावी लागत आहे. अनेकांनी तर नातेवाइकांकडे सांभाळायला दिली आहेत. परिसरात कुठेही चारा छावणी नाही. रोजगाराचे कुठलेही साधन नाही. शेतीतून उत्पन्न नाही. त्यामुळे मुला-मुलींचे लग्नकार्य लांबणीवर पडले आहेत. पाहुणे येणार म्हटलं की अंगावर काटा उभा राहतो.
सरपंच म्हणतात़़़
पाणीच नसल्याने जनावरांना खराब पाणी पाजावे लागते. पाण्याचा वास येत असल्याने जनावरे पाणी पीत नाही. महिलांना दीड ते दोन किलोमीटर अंतरावरून पिण्यासाठी पाणी आणावे लागत असल्याने महिलांना कुठेही जाता येत नाही. दिवसभर एकच काम ते म्हणजे हंडाभर पाणी गोळा करणे. गावासाठी स्वतंत्ररीत्या पाणीपुरवठा योजना मंजूर होणे गरजेचे आहे.
- योजना चोळके, सरपंच

Web Title:  Water tanker for fifteen years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.