कडवा योजनेतून पाणी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:14 AM2021-04-04T04:14:21+5:302021-04-04T04:14:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर : सिन्नर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कडवा धरणातील पाणीपुरवठा योजनेतील एअरव्हॉल्व्ह लिक करून परिसरातील शेतकऱ्यांकडून पाणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : सिन्नर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कडवा धरणातील पाणीपुरवठा योजनेतील एअरव्हॉल्व्ह लिक करून परिसरातील शेतकऱ्यांकडून पाणी चोरी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाणीचोरी करणाऱ्यांवर नगर परिषदेमार्फत कडक कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कडवा धरणातून नगर परिषदेची पाणीपुरवठा योजना सुरू आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कडवा धरणाजवळील आगासखिंड, बोरखिंड, बेलू अशा विविध ठिकाणी नगर परिषदेच्या पाणीपुरवठ्याच्या मुख्य जलवाहिनीवर असणारे एअरव्हॉल्व्ह स्थानिक शेतकऱ्यांनी लिक करून येथून सर्रास पाणीचोरी केली जात आहे. पाणीचोरी होत असल्याने सिन्नरकरांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ पोहोचत आहे.
त्यामुळे मुख्याधिकारी संजय केदार यांच्या आदेशानुसार नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीचोरीला आळा घालण्यासाठी विशेष पथक नेमले आहे. त्यानुसार यापुढे पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीवरून पाणीचोरीचे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर दंड संहिता कलम ३७९ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा नगर परिषदेमार्फत देण्यात आला आहे.
----------------------
सिन्नर तालुक्यातील बोरखिंड शिवारात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरील एअरव्हॉल्व्ह लिकेज केल्यामुळे पाणी वाया जात आहे. (०३ सिन्नर २)
===Photopath===
030421\03nsk_14_03042021_13.jpg
===Caption===
०३ सिन्नर २