कडवा पाणीपुरवठा योजनेतून पाणी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:14 AM2021-04-07T04:14:09+5:302021-04-07T04:14:09+5:30
चिंचोलीत नळपाणी पुरवठा सुरळीत सिन्नर : तालुक्यातील चिंचोली येथे गेल्या काही दिवसांपासून परिसरातील वाड्या वस्त्यांवर पिण्याचे पाणी मिळत नव्हते. ...
चिंचोलीत नळपाणी पुरवठा सुरळीत
सिन्नर : तालुक्यातील चिंचोली येथे गेल्या काही दिवसांपासून परिसरातील वाड्या वस्त्यांवर पिण्याचे पाणी मिळत नव्हते. त्यामुळे पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत होती. ग्रामपंचायत सदस्य आदिती आमले यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर तातडीने रहिवाशांना पिण्याचे पाणी मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
समृध्दीची अवजड वाहतूक थांबवा
सिन्नर : समृद्धी महामार्गाच्या वजनदार वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. परिसरातील गावांमधून मुरुम व माती काढण्याचे काम झपाट्याने सुरु आहे. मात्र, अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. वाहनांवरील चालकांकडून वारंवार वाहतुकीचे नियम न पाळल्याने वादाचे प्रसंग निर्माण होतात.
दापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण
सिन्नर : तालुक्यातील दापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील काही उपकेंद्रांवर तसेच दोडी ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होणार नाहीत.
इंधन दरवाढीचा परिणाम
सिन्नर : देशभरात डिझेलचे भाव गगनाला भिडल्यामुळे सर्वच क्षेत्रांना त्याचा फटका बसत असून, प्रामुख्याने ग्रामीण भागातील शेतीला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. डिझेलचे भाव वाढल्याने शेती मशागतीच्या साधनांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे खर्च आणि पिकांच्या उत्पन्नाचा ताळमेळ बसत नाही.
तापमानाचा पारा चाळिशीकडे
सिन्नर : शहर व ग्रामीण भागात चार दिवसांपासून तापमानातील पारा वाढल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. तापमानाच्या पाऱ्याची आता ४० अंशांकडे वाटचाल सुरू आहे. वातावरणातील बदलामुळे सकाळी ९ वाजल्यापासूनच ऊन तापण्यास सुरुवात होत आहे. दुपारी १२ ते ४ यादरम्यान उन्हाचे चांगलेच चटके जाणवत आहेत. सायंकाळीदेखील आता वातावरणात उकाडा जाणवतो.