पहिल्याच पावसात पांझन रेल्वे पूल पुलाखाली पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 03:00 PM2021-05-31T15:00:20+5:302021-05-31T15:00:42+5:30

मांडवड : नांदगाव तालुक्यात रविवारी झालेल्या पहिल्याच पावसात पांझन रेल्वे पुलाखाली पाणी आले. त्यामुळे मांडवड, लक्ष्मीनगर भालूर नागरिकांना परत ये रे माझ्या मागल्याची प्रचिती येत आहे.

Water under the Panjan bridge in the first rain | पहिल्याच पावसात पांझन रेल्वे पूल पुलाखाली पाणी

पहिल्याच पावसात पांझन रेल्वे पूल पुलाखाली पाणी

Next

नांदगाव : तालुक्यात रविवारी झालेल्या पहिल्याच पावसात पांझन रेल्वे पुलाखाली पाणी आले. त्यामुळे मांडवड, लक्ष्मीनगर भालूर नागरिकांना परत ये रे माझ्या मागल्याची प्रचिती येत आहे. पांझन रेल्वे पूल हा कायम बांधकाम करून त्याच्या पूर्वीच्या आकारापेक्षा आता लहान झाला आहे. बाजूच्या डोंगरदऱ्यातून येणारे पाणी हे या पुलाखाली साचत आहे. आता हा त्रास संपूर्ण पावसाळा होईपर्यंत राहणार आहे. त्यामुळे वरील गावातील नागरिकांना नांदगाव ये-जा करण्यासाठी नेहमीच त्रास होण्याची शक्यता आहे. तालुक्याला जाण्यासाठी मांडवड नांदगाव हा रस्ता महत्त्वाचा असून, दुसरा पर्यायी मार्ग पण नाही. त्यामुळे संबंधित विभागाने वेळीच लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा ही मागणी होत आहे.

Web Title: Water under the Panjan bridge in the first rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक