पांझण रेल्वेपुलाखाली पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 06:39 PM2020-07-31T18:39:28+5:302020-07-31T18:40:17+5:30

मांडवड : पांझण रेल्वेस्टेशनजवळ असलेल्या रेल्वेपुलाखाली पावसाचे पाणी साचत असल्याने मांडवड, लक्ष्मीनगर, भालूर, तसेच मोहेगाव परिसरातील नागरिकांना व शेतक-यांना ...

Water under the Panjhan railway bridge | पांझण रेल्वेपुलाखाली पाणी

पांझण रेल्वेपुलाखाली पाणी

Next

मांडवड : पांझण रेल्वेस्टेशनजवळ असलेल्या रेल्वेपुलाखाली पावसाचे पाणी साचत असल्याने मांडवड, लक्ष्मीनगर, भालूर, तसेच मोहेगाव परिसरातील नागरिकांना व शेतक-यांना जाण्या-येण्यासाठी अडचण होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. हा रेल्वेपूल ब्रिटिशकालीन असून, मध्यंतरी त्याचे काम करण्यात आले होते. यावेळी त्याची उंची कमी झाली आहे. त्यामुळे परिसरातील बससेवा गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. पावसाळ्यात पुलाखाली पाणी साचत असल्याने दुचाकीने जाणेसुद्धा कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना तालुक्याशी संपर्कसाधने कठीण झाले आहे. यापूर्वी तत्कालीन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडे मांडवड व लक्ष्मीनगरकरांनी व्यथा मांडली होती, मात्र समस्या ‘जैसे थे’ आहे.

Web Title: Water under the Panjhan railway bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक