नगरसूलसाठी खिर्डीसाठे तलावातून पाणी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 07:01 PM2021-02-04T19:01:18+5:302021-02-04T19:01:56+5:30
नगरसूल : येवला तालुक्यातील ब्रिटिशकालीन खिर्डीसाठे साठवण तलावातून नगरसूलसाठी पाणी सोडण्यात आले असून त्यामुळे नगरसूलकरांना ऐन उन्हाळ्यात जाणवणारी पाण्याची धग कमी होण्यास मदत होणार आहे.

खिर्डीसाठे हा पूर्ण मातीचा तलाव असून गेल्या पावसाळ्यात तो पूर्ण क्षमतेने भरला आहे. दरम्यान, गावातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत असल्याने नगरसूल ग्रामपंचायतीने गावतील साठवण बंधारा भरून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार गुरुवारी (दि. ४) पालखेड पाटबंधारे उपविभागीय कार्यालय-१ च्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तलावातून पाणी सोडण्यात आले. या वेळी नगरसूल ग्रामपंचायतीचे गटनेते निकेत पाटील, पंचायत समिती उपसभापती मंगेश जाधव, संभाजी बोरसे, डॉ. मनोज महाले, शिवाजी बोरसे, पांडू सानप, अशोक सानप, वसंत सानप आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
खिर्डीसाठे साठवण तलावातील ५.४८७ दलघफू पाणी हे नगरसूल ग्रामपंचायतीला आरक्षित केलेले असून त्यातून साठवण बंधारा भरून दिला जात आहे. या पाण्याने तांबडधोंडा, नगरसूल वसंत बंधारा हा पूर्ण क्षमतेने भरणार आहे.