पालखेड डाव्या कालव्यातून पाण्याचा अपव्यय
By admin | Published: December 22, 2016 12:41 AM2016-12-22T00:41:59+5:302016-12-22T00:42:13+5:30
पालखेड डाव्या कालव्यातून पाण्याचा अपव्यय
पिंपळगाव बसवंत : येथून जाणाऱ्या पालखेड डाव्या कालव्यातून रोज लाखो लिटर पाणी वाया जात असून, गावातील अनेक नगरांमध्ये गेल्या दहा दिवसांपासून पाणीच पाणी दिसत आहे. या वर्षातच काही महिन्यांपूर्वी याच पाण्यावरून दोन जिल्ह्यांमध्ये संघर्ष सुरु होता. नागरिकांना सुरक्षा देणारी यंत्रणा याच पाटावर रात्रंदिवस पहारा देत होती. आज मात्र गेल्या दहा दिवसांत लाखो लिटर पाणी वाया जात आहे नेमीनाथ नगर , शिक्षक कॉलिन, यशवंत नगर भागाततील रस्ता पाण्यात गेले आहेत. ग्रामपंचायतीनेही लाखो रूपये खर्च करून डांबरीकरण केले मात्र गेल्या दहा दिवसांपासून वाहत असलेल्या पाण्याने रस्त्याची दुरअवस्था झाली आहे. पाटबंधारे खात्याने अद्याप याची दखल घेतली नाही. सदर पाणी न थांबल्याच पाटाला कधीही भगदाड पडुन नगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही.