वैतरणा धरणाचा कालवा फुटल्याने पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 06:09 PM2018-12-11T18:09:33+5:302018-12-11T18:09:40+5:30
घोटी : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा धरणाच्या कालव्याचा बांध तुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. देखभाल आणि दुरु स्तीच्या नावाखाली लाखो रु पयांचा निधी वाया जात आहे. याबाबत आज श्रमजीवी संघटनेने ही घटना उघडकीसआणली. दरम्यान याबाबत प्रशासनाला माहीती मिळताच कालव्याद्वारे पाणी तात्काळ बंद करण्यात आले.
घोटी : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा धरणाच्या कालव्याचा बांध तुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. देखभाल आणि दुरु स्तीच्या नावाखाली लाखो रु पयांचा निधी वाया जात आहे. याबाबत आज श्रमजीवी संघटनेने ही घटना उघडकीसआणली. दरम्यान याबाबत प्रशासनाला माहीती मिळताच कालव्याद्वारे पाणी तात्काळ बंद करण्यात आले. तातडीने दुरु स्तीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र श्रमजीवी संघटनेने दुरु स्तीला काही महिने लागणार असल्याचे सांगत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अप्पर वैतरणा धरणापासुन विज निर्मिती केंद्रापर्यत सहा ते आठ किलोमीटरचे २कालवे आहेत. आज सकाळी एका कालव्याद्वारे विज निर्मितीसाठी ३०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र धाराचीवाडी जवळ कालव्याचा बांध तुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. पाणी वाया जात असल्याने श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे ही घटना उघडकीस आणली. याबाबत गवगवा होताच पाटबंधारे विभागाने कालव्याद्वारे होणारा विसर्ग तात्काळ थांबवला. प्रशासनाने या कालव्याची डागडुजी करण्यात आलेली नाही. या कालव्याची डागडुजी करून कालव्यावर सुरिक्षत जाळी बसवण्याची मागणी जुनी आहे.
छायाचित्र:
?) कालवा फुटल्याने वाया जाणारे पाणी.(11घोटी कालवा)