चणकापूरचे पाणी पेटले

By Admin | Published: February 23, 2016 10:15 PM2016-02-23T22:15:11+5:302016-02-23T22:29:41+5:30

उपअभियंत्याचे वाहन अडविले : काही काळ तणावाची परिस्थिती

Water from the water of Champakpur | चणकापूरचे पाणी पेटले

चणकापूरचे पाणी पेटले

googlenewsNext

 कळवण : भेंडी गावातील पिण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी चणकापूरच्या उजव्या कालव्याला पाणी सोडल्यानंतर प्रथम भेंडी पाझर तलाव भरावा या मागणीला यश आल्यानंतर अचानक कालव्याचे किमी २६वरील आपत्कालीन गेट वेल्डिंग करून ते बंद केल्याने भेंडी पाझर तलावात जाणारे पाणी बंद झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाच्या उपअभियंत्यांचे वाहन अडवून त्यांना जाब विचारल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र समन्वयातून परिस्थिती नियंत्रणात आली.याप्रकरणी कळवण पोलिसांनी मंगळवारी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकाना अटक करून आणल्याने संपूर्ण भेंडी गावातील युवक, महिला व शेतकरी बांधवांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेत स्वत:ला अटक करून घेतल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
भेंडी आणि जुनी भेंडी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठल्याने सध्या पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. भेंडी पाझर तलाव भरल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने पाण्यासाठी या गावातील जनतेच्या तळमळीला महसूल, पाटबंधारे आणि पोलीस यंत्रणेने नेहमी सहकार्य केले असल्याने या गावातील टंचाईच्या झळा प्रशासकीय यंत्रणेला-देखील ज्ञात आहे, चणकापूर उजव्या कालव्याद्वारे मिळालेले पाणी पिण्यासाठी ३१ जुलैपर्यंत वापरण्याचे आवाहन ग्रामपंचायतीसमोर असल्याने पाझर तलाव न भरता पाणी बंद झाल्याने वादाला ठिणगी पडली. उजव्या कालव्याचे आपत्कालीन गेटजवळ राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ, उपसरपंच विलास रौंदळ यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेत उपअभियंता पाटील यांना जाब विचारत घेराव घालून वाहन अडवून गांधीगिरीने त्यांचा सत्कार केला.
शिवाय गेटवर बसून टाळ-मृदृंग वाजवत ‘पाटबंधारे विभागाचे पाटील यांना सुबुध्दी दे’ अशी प्रार्थना केली; मात्र ग्रामस्थांची भूमिका समजावून न घेता पाटील यांनी पोलिसांकडे तक्रार केली. घटनास्थळी तहसीलदार अनिल पुरे आणि पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांनी धाव घेत आंदोलकांना
अटक केल्याने प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचल्याने गावातील यात्रा महोत्सवाच्या आनंदावर विरजण टाकून ग्रामस्थांनी व महिलांनी पोलिस स्टेशन गाठून
स्वत:ला अटक करून घेतली.पोलीस स्टेशनसह आवारात ग्रामस्थांनी एकच
गर्दी केल्याने पाणीप्रश्न
पेटण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांनी धाव घेत पाठिंबा दिला. याप्रश्नी मविप्रचे संचालक रवींद्र देवरे, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, शेतकरी नेते देवीदास पवार, शांताराम जाधव, राजेंद्र भामरे यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत पाणीप्रश्नी घेतलेली आक्रमक भूमिका व भेंडी ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे शासकीय यंत्रणा हतबल झाली. त्याचा प्रत्यय येत भेंडीकरांना पाण्याचा दिलासा मिळाला. (वार्ताहर)
मविप्र संचालक रवींद्र देवरेंसह सर्वच पक्षांनी याप्रश्नी मध्यस्थी करत भेंडीचा पाणीप्रश्न सोडविला.


चणकापूरच्या पाण्याने पेट घेतल्याची चिन्हे निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये तसेच पूर्व भागातील जनतेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, भेंडीच्या पिण्याच्या पाण्याची सोडवणूक आण िपाटबंधारे विभागाचे पाणी सोडण्याबाबत असलेल्या धोरणाबाबत जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे यांनी महत्वपूर्ण बजावत भेंडी ग्रामस्थ आण िपाटबंधारे विभागाच्या यंत्रणेमध्ये समन्वय घडविला, याप्रश्नी मविप्रचे संचालक रवींद्र देवरे, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे ,,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास पवार ,कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार ,वसाकाचे माजी उपाध्यक्ष शांताराम जाधव ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार ,शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख संजय रौंदळ तसेच आंदोलनकर्ते राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ ,उपसरपंच विलास रौंदळ यांनी पाणी प्रश्नी जनिहताची भूमीका घेऊन नेतृत्वातील आक्र मकपणा टिकून ठेवल्याने पोलिस आण िपाटबंधारे विभागाच्या यंत्रणेवर दबाव वाढल्यामुळे पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेला आपली धार बोथट करावी लागली

Web Title: Water from the water of Champakpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.