सिन्नर महाविद्यालयात पानीफाऊंडेनशची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 05:48 PM2019-02-01T17:48:37+5:302019-02-01T17:48:49+5:30
सिन्नर : पानी फाऊंडेशन आयोजित युवा शक्तीचे युध्द दुष्काळविरुध्द या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच सिन्नर महाविद्यालयात करण्यात आले होते.
सिन्नर : पानी फाऊंडेशन आयोजित युवा शक्तीचे युध्द दुष्काळविरुध्द या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच सिन्नर महाविद्यालयात करण्यात आले होते.
फाऊंडेशनचे तालुका समन्वयक प्रवीण डोनगावे, सुषमा मानकर, नागेश गरड यांनी यावेळी मार्गदर्शन केले. महाराष्टÑात येऊ घातलेल्या दुष्काळाविरुध्द युवकांनी पाणी प्रश्नाबद्दल जाणीव निर्माण करणे या हेतूने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत दिवसभरात विद्यार्थ्यांना गंभीर होत चाललेल्या पाणीप्रश्न दुष्काळ निसर्गनिर्मित का मानवनिर्मित, पाणलोट विकास म्हणजे काय आणि पाण्याचा झालेला अतिउपसा आदि गोष्टी विविध सत्रांमधून शिकविल्या गेल्या. यावेळी महाविद्यालयातर्फे प्राचार्य दिलीप शिंदे, उपप्राचार्य आर. व्ही. पवार, श्रीकांत सहस्त्रबुध्दे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.