भावली धरणातील जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 05:48 PM2019-08-02T17:48:18+5:302019-08-02T17:48:32+5:30
शंभर टक् के भरले : शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती
घोटी : तालुक्यातील निसर्गाचे वरदान लाभलेले भावली धरण शंभर टक्के भरल्यानंतर जलाभिषेक सुरू असतानाच आमदार निर्मला गावीत यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. तालुक्यातील शेतकऱ्यांना सुख समाधान लाभू दे, अशी मनोकामना यावेळी उपस्थितांनी जलदेवतेकडे केली.
तहसीलदार वंदना खरमाळे, गटविकास अधिकारी किरण जाधव, कार्यकारी अभियंता रमेश गावित, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, हवालदार विनोद गोसावी, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष कचरू पा. डुकरे, कार्यकारी अभियंता राजेन्द्र शिंदे, शाखा उपअभियंता प्रमोद कुलकर्णी, प. स. सदस्य सोमनाथ जोशी, अण्णा पवार आदी यावेळी उपस्थित होते. जलपूजन कार्यक्र म झाल्यानंतर परिसरातील शेतीची व धरण परिसराची त्यांनी पाहणी करत, शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रचंड प्रमाणात पावसाने गेल्या आठ दिवसापासून संततधार सुरु ठेवल्याने पुरमय परिस्थिती, भात शेतीची पाहणी आमदार गावित यांनी करत अधिका-यांना सूचना केल्या. भावली धरणात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात झाला असून, परिसरात पर्यटकांची चांगलीच गर्दी होत आहे. नगर परिषदेकडे वाटचाल करणा-या घोटी शहराला लवकरच भावली ते घोटी जलवाहिनीचे काम सुरु करण्यात येणार असल्याचेही गावित यांनी सांगितले. यावेळी, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब वालझाडे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष मथुरा जाधव, तात्यापाटील भागडे, भाऊराव भागडे, नारायण वळकंदे, सचिन मते, इगतपुरीचे नगरसेवक संपत डावखर, भगीरथ डावखर, साहेबराव धोंगडे, गुलाब वाजे, दिलीप शिंदे, राजेंद्र पा.जाधव पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.