पाणीबाणी : नाशिकरोडसह पूर्व विभागात नागरिकांचे हाल महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:50 AM2018-04-07T00:50:56+5:302018-04-07T00:50:56+5:30

नाशिक : गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी मुख्य सीमेंटची पाइपलाइन इंडिगो पार्कजवळ नादुरुस्त झाल्याने तिचे दुरुस्तीचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत हाती घेण्यात आले.

Waterborne: Nashik Road, Nashik Road, Municipal Corporation | पाणीबाणी : नाशिकरोडसह पूर्व विभागात नागरिकांचे हाल महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा मनस्ताप

पाणीबाणी : नाशिकरोडसह पूर्व विभागात नागरिकांचे हाल महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा मनस्ताप

Next
ठळक मुद्देपूर्व विभागातील प्रभागांमधील नागरिकांचे प्रचंड हालपरंतु, ढिसाळ नियोजनाचा फटका नागरिकांना बसला

नाशिक : गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी मुख्य सीमेंटची पाइपलाइन इंडिगो पार्कजवळ नादुरुस्त झाल्याने तिचे दुरुस्तीचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत हाती घेण्यात आले. परंतु, दुरुस्ती कामाचा अंदाज न आल्याने मनपाच्या या ढिसाळ नियोजनाचा नागरिकांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे, दि. ३ ते ५ एप्रिलपर्यंत सलग तीन दिवस नाशिकरोड आणि पूर्व विभागातील प्रभागांमधील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी (दि.६) कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी मुख्य सीमेंटची पाइपलाइन सोमवारी (दि.२) नादुरुस्त झाली होती. त्यानुसार, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जाहीर परिपत्रक काढून दि. ३ एप्रिल रोजी नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक १६, १७, १८, १९, २०, आणि पूर्व विभागातील २१, २२, २३ आणि ३० मध्ये दिवसभर पाणीपुरवठा होणार नसल्याचे नागरिकांना कळविले. पाणीपुरवठा विभागाने सदर पाइपलाइन दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेणे गरजेचे होते. परंतु, दुरुस्त कामासंदर्भात निर्णय घेण्यासच विलंब लागला गेला आणि मंगळवारी कामच झाले नाही. त्यामुळे, बुधवारी (दि.४) कामास सुरुवात झाली.
परिणामी, बुधवारीही पाणीपुरवठा होऊ शकला नाही. दरम्यान, दुरुस्ती कामातील गुंतागुंत वाढत गेल्याने गुरुवारी (दि.५)देखील महापालिकेला सदर भागात पाणीपुरवठा करता आला नाही. पाणीपुरवठा विभागाने सदर कामाचा अंदाज घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे गरजेचे होते. परंतु, ढिसाळ नियोजनाचा फटका नागरिकांना बसला आणि सलग तीन दिवस पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. मंगळवार आणि बुधवारी या दोन दिवशी नागरिकांनी साठविलेल्या पाण्याचा कसाबसा वापर केला. परंतु, सलग तिसऱ्या दिवशी पाणी न आल्याने गुरुवारी (दि.५) मात्र नागरिकांचे प्रचंड हाल झाले. नागरिकांना खासगी टॅँकर मागवून पाण्याची सोय करावी लागली, तर नाशिकरोड विभागीय कार्यालयाकडून वाहनचालक नसल्याचे उत्तर ऐकायला मिळाले.
सलग तीन दिवस पाणीपुरवठा होऊ न शकल्याने पाणीपुरवठा विभागाने दिलगिरी व्यक्त केली आहे. सदर पाइपलाइन ही सीमेंटची असल्याने सावधपणे काम करणे आवश्यक होते. जराशी कुठे चूक झाली असती तर इतर पाइपलाइनला धोका होता. दोन दिवसांत महापालिकेकडे पाणीपुरवठ्या संदर्भात सुमारे ४० तक्रारी आल्या. याशिवाय, महापालिकेच्या आठ टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी दिली.

Web Title: Waterborne: Nashik Road, Nashik Road, Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.