बोलठाण येथे पाणपोई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 02:54 PM2019-03-17T14:54:25+5:302019-03-17T14:54:34+5:30
लोकमत न्यूज जातेगाव नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे वाघोबा मित्रा मंडळाच्या वतीने गेल्या दिडदशका पासूनची परंपरा कायम ठेवत यंदा देखील ग्रामस्थ व बाहेरगावाहून येणारे नागरिकांसाठी पाणपोई सुरू केली आहे.
लोकमत न्यूज
जातेगाव नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे वाघोबा मित्रा मंडळाच्या वतीने गेल्या दिडदशका पासूनची परंपरा कायम ठेवत यंदा देखील ग्रामस्थ व बाहेरगावाहून येणारे नागरिकांसाठी पाणपोई सुरू केली आहे.
बोलठाण हे ग्रामीण बाजारपेठेचे गाव असल्या कारणाने तसेच उपबजार समतिी, जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक आॅफ इंडिया, पेट्रोल पंप यासारख्या सुविधा मुळे नेहमी बाहेरगावहुन येणार्यांची मोठ्या प्रमाणात पंचक्र ोशीतील शेतकरी बांधवांसह नागरिक येथे येत असतात परिसरात पाणी टंचाइ असल्याने पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली आहे. "जेऊन जा पण पाणी मागू नका" अशी अवस्था असतांना माणुसकी ला जोपासत हा उपक्र म निरंतर सुरू ठेवत हिंदू मुस्लिम एकतेचे एक प्रतीक निरंतर सुरूच ठेवल्यामुळे परिसरातून वाघोबामित्र मंडळाचे कौतुक केले जात आहे. सरपंच ज्ञानेश्वर नवले यांच्या हस्ते वरील उपक्र माचे उदघाटन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य म च्छिंद्र पठाडे, पोलीस पाटील सोमनाथ खरोटे,संतोष बनकर,राजेंद्र डोंगरे, अन्सार सय्यद,नितीन देशमुख, संदीप रिंढे, शीतल कासलीवाल,मुन्ना टेलर,अिसफ टेलर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.