कोरोना टाळण्यासाठी जलनेती प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:14 AM2021-05-15T04:14:58+5:302021-05-15T04:14:58+5:30

नाशिक : जलनेती ही शुध्दिक्रिया कोरोनावर अत्यंत प्रभावी सिध्द होते आहे़ असा अनेक योगतज्ज्ञांचा दावा आहे, त्यामुळे त्याचा सराव ...

Waterlogging effective to prevent corona | कोरोना टाळण्यासाठी जलनेती प्रभावी

कोरोना टाळण्यासाठी जलनेती प्रभावी

Next

नाशिक : जलनेती ही शुध्दिक्रिया कोरोनावर अत्यंत प्रभावी सिध्द होते आहे़ असा अनेक योगतज्ज्ञांचा दावा आहे, त्यामुळे त्याचा सराव करून वापर करण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी तज्ज्ञांचीं प्रात्यक्षिके आयोजित केली तसेच नागरिकांना जलनेतीचा वापर करून कोरोनाला दूर ठेवावे असे आवाहनदेखील केले.

प्राणायम आणि योगासने कोरोनावर मात करण्यासाठी प्रभावी ठरत आहेत. अनेकांनी त्यांचे स्वानुभव कथन केली आहेत. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. केळकर आणि त्यांच्याकडील सर्व डॉक्टर व नर्सेसचा स्टाफ गेल्या सव्वा वर्षापासून नियमित जलनेती करीत आहे. त्यामुळे कोविड पेशंटच्या सतत संपर्कात असूनदेखील त्यांच्यापैकी एकजणदेखील आतापर्यंत कोरोनाबाधित झालेला नाही असा डॉक्टरांचा दावा आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या पंचवीस वर्षांपासून योगशास्त्राचा अभ्यास करीत असलेल्या योगाचार्य राज सिन्नरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रामायण येथे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

जलनेती या शुध्दिक्रियेला अनेक योगग्रथांचा शास्त्रोक्त आधार आहे. जलनेतीला वयाचे बंधन नाही. नाकाचे ऑपरेशन झालेल्यांनी योगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि कानाच्या पडद्याला छिद्र पडलेले असेल त्यांनी व कोरोनाचा तीव्र संसर्ग झाला असेल त्यांनी देखील रोगमुक्त होईपर्यंत ही क्रिया करू नये असे राज नगरकर यांनी सांगितले.

यावेळी सभागृहनेते सतीश सोनवणे व गटनेते जगदीश पाटील, योगाचार्य राज सिन्नरकर, योग शिक्षक चैतन्य कुलकर्णी, इशरत मर्चंट, पतंजलीचे डॉ. सचिन पाटील उपस्थित होते.

इन्फो..

अशी करा जलनेती

जलनेतीमध्ये एक विशिष्ट पात्र वापरले जाते त्यात कोमट पाणी आणि सैंधव मीठ यांचे मिश्रण बनवून टाकावे. गुडघ्यावर ओणवे होऊन मान किंचीत पुढे व तिरपी करावी आणि एक अशी स्थिती सापडते की त्या पात्राच्या तोटीतून एका नाकपुडीत टाकलेले पाणी दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर पडते. ही जलनेती क्रिया करीत असतांना सतत तोंडाने श्वास घ्यावयाचा असतो. मिठाला एक रसाकर्षक दाब असतो. त्यामुळे नासिकामार्ग तर स्वच्छ होतोच परंतु त्यामागील पॅरानेझल कॅविटीमधील सूक्ष्म जंतू विषाणू ओढून बाहेर काढले जातात, असे यावेळी योगाचार्य सिन्नरकर यांनी सांगितले.

-----

छायाचित्र एनएसके वर... जलनेतीची योगाचार्य राज सिन्नरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिके रामायण येथे सादर करण्यात आली. समवेत महापौर सतीश कुलकर्णी.

Web Title: Waterlogging effective to prevent corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.