भाव नसल्याने टरबूज झाले मेंढ्यांचे खाद्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 04:52 PM2019-06-05T16:52:14+5:302019-06-05T16:52:52+5:30
खामखेडा : योग्य भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या टरबूज पिकाच्या शेतात मेंढ्या सोडल्या आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी विकत पाणी घेऊन टरबूजचे पीक घेतले. टरबूज काढणीसाठी तयार झाले आणि आचनक भाव कोसळल्याने ते शेतातून काढून बाजारात विकून उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने काही शेतकºयांनी टरबूज मेंढ्यांसमोर टाकले आहे. मेंढपाळ टरबूज फोडून मेंढ्यांना खाऊ घालत आहेत.
खामखेडा : योग्य भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या टरबूज पिकाच्या शेतात मेंढ्या सोडल्या आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी विकत पाणी घेऊन टरबूजचे पीक घेतले. टरबूज काढणीसाठी तयार झाले आणि आचनक भाव कोसळल्याने ते शेतातून काढून बाजारात विकून उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने काही शेतकºयांनी टरबूज मेंढ्यांसमोर टाकले आहे. मेंढपाळ टरबूज फोडून मेंढ्यांना खाऊ घालत आहेत. त्यांच्या मोबदल्यात मेंढपाळ आपल्या मेंढ्यांचा वाडा शेतकºयाच्या शेतात बसवत आहे. यातून शेतात खत म्हणून जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होत आहे. ज्या शेतकºयांकडे थोड्याफार प्रमाणात ज्वारीचा हिरवा कडबा आहे तो चारा मेंढपाळांना देऊन रात्रभर मेंढ्या शेतात बसवल्या जातात. यावर्षी रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्याने पाण्याबरोबर चाºयाचा प्रश्न गंभीर बनल्याने मेंढपाळ व्यवसाय धोक्यात आला आहे. दोन-तीन दिवसात मृग नक्षत्राला सुरुवात होईल मात्र पावसाचे चिन्हे नाही. खामखेडा परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्यामुळे कांद्याची पात चारण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात बाहेर गावचे मेंढपाळ मेंढ्या घेऊन येथे येतात. साधारण एप्रिल माहिन्यापासून कांदा काढणीला सुरुवात होते. परंतु यावर्षी पाऊस कमी झाल्याने विहिरींना पाणी राहणार नाही म्हणून शेतकºयांनी उन्हाळी कांद्याची लवकर लागवड केली परिणामी काढणी लवकर झाली. एप्रिल महिना संपण्याच्या आतच कांदा काढणी झाल्याने मेंढ्यांसाठी चारा शिल्लक राहिला नाही. तसेच या परिसरातील काही शेतकरी उन्हाळी भुईमुगाची पेरणी करीत असे. भुईमुगाची काढणीला साधारण मे महिन्यात सुरु वात होते. तेव्हा भुईमुगाच्या शेतातील गवत व पालापाचोळा मेंढ्यांसाठी चारा म्हणून मिळत असे. त्यामुळे मेंढपाळांचा प्रश्न सुटत असे. परंतु गेल्या काही वर्षांपासून विहिरींना पाणी नसल्याने उन्हाळी भुईमुगाचे पीक शेतकरी करीत नाही. त्यामुळे यावर्षी मेंढपाळांना मोठ्या प्रमाणात चाराटंचाई जाणवू लागली आहे. खामखेडा परिसरात दाखल मेंढ्यांचे चारा-पाण्याअभावी हाल होत आहे.
मागच्या वर्षी कांद्याला भाव नसल्याने मेंढपाळ मेंढ्यांसाठी खराब कांदे विकत घेऊन खाद्य म्हणून उपयोग करीत होते. यावर्षी खराब कांद्यालाही भाव असल्याने महाग कांदा विकत घेऊन मेंढ्यांना खायला घालणे परवडत नाही. पूर्वी शेतात गावठी बाभळाची लिंबाचे वृक्ष मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे लिंब-बाभळीच्या पाल्यावर भागत असे. परंतु आता वृक्षांची संख्या कमी झाल्याने अगदी अल्पशा झाडांच्या पाल्यावर मेंढीची भूक भागवावी लागत आहे. यंदा उन्हाळ्याच्या दिवसात मेंढ्यांना बाभळीचा पाला-शेंगा चारून कसातरी मे महिना काढला. चालू वर्षी सुरुवातीला चंगला पाऊस पडेल अशी अपेक्षा होती; परंतु जून महिना सुरू लागूनही पावसाचे काही चिन्हे नाही. त्यामुळे मेंढीपालन व्यवसाय धोक्यात आला आहे.