शहरात ठिकठिकाणी टरबूजची दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:14 AM2021-03-15T04:14:08+5:302021-03-15T04:14:08+5:30

शहरातील मनपाच्या पाणपोई गायब नाशिक: महापालिकेच्या शहरात ठिकठिकाणी पाणपोई उपलब्ध होत्या. परंतु नंतरच्या काळात रस्ता रुंदीकरण तसेच गैरसोयीमुळे त्या ...

Watermelon shops all over the city | शहरात ठिकठिकाणी टरबूजची दुकाने

शहरात ठिकठिकाणी टरबूजची दुकाने

Next

शहरातील मनपाच्या पाणपोई गायब

नाशिक: महापालिकेच्या शहरात ठिकठिकाणी पाणपोई उपलब्ध होत्या. परंतु नंतरच्या काळात रस्ता रुंदीकरण तसेच गैरसोयीमुळे त्या काढून टाकण्यात आल्या आहेत. ऊन्हाच्या दिवसात काही सेवाभावी व्यक्ती आणि संस्था धर्मार्थ पाणपोई चालविल्या जातात.

ग्रामीण भागातही महिलांचा गौरव

नाशिक: जागतिक महिलादिनी केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही महिलांच्या कर्तत्वाचा सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे तसेच सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येऊन महिलांना सन्मान करण्यात आला.

फ्रावशी ॲकेडमीत बालिका दिन

नाशिक: फ्रावशी ॲकेडमी शाळेत ऑनलाइन पद्धतीने बालिका दिन साजरा करण्यात आला. शाळेच्या माजी विद्यार्थ्यानी यावेळी विविध कलागुण सादर केले. बालिका शक्ती विषयावर पोस्टर स्पर्धाही घेण्यात आली. महिलांनी विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाविषयी अनेकांनी संदेश दिले.

यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

नाशिक: मविप्र समाज संस्थेच्यावतीने माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कर्मवीर बाबुराव ठाकरे यांची जयंती देखील उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गुलाब भामरे होते. सूत्रसंचालन अर्चना गाजरे व चैताली गीते यांनी केले. आभार संजय डेर्ले यांनी मानले.

जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

नाशिक: जेईई मेनच्या मार्च परिक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. प्रवेश परीक्षा १५ ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. यासाठी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. दोन सत्रात होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थी तयारी करीत आहेत.

पेट्रोल पंपावर नियमांचे उल्लंघन

नाशिक: पेट्रोल पंपावर फोनवर बालण्यास मनाई असतांनाही अनेक वाहनधारक आणि अनेकदा तेथील कर्मचारीही भ्रमणध्वनीवर बोलत असतात. याबाबत पेट्रोल मालकांकडून सूचना लावण्यात आलेल्या आहेत, परंतु त्याचे पालन होतांना दिसत नाही.

भाजी बाजार सुरू; डिस्टन्स दुर्लक्षित

नाशिक: भाजी बाजार सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली असली तरी बाजारात विक्रेत्यांनी सुरक्षित अंतराकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. वास्तविक भाजी बाजारात होणारी गर्दी लक्षात घेता विक्रेता आणि ग्राहकांनी स्वयंशिस्तीने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने देखील लक्ष देण्याची मागणी होत आहे.

विभागीय पातळीवर काेरोनाची माहिती

नाशिक: राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याचा कोरोनाचा आढावा घेतला जात आहे. विभागातील माहिती देखील सादर करण्यात येणार असल्याचे त्यादृष्टीने उत्तर महाराष्ट्रातील माहिती संकलित करण्याचे कामकाज सुरू झाले आहे.

Web Title: Watermelon shops all over the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.