पाण्यासाठी रानोमाळ भटकंती

By admin | Published: May 25, 2017 11:06 PM2017-05-25T23:06:51+5:302017-05-25T23:07:07+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यातील जनतेला लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आणि पंचायत समितीच्या दुर्लक्षामुळे कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे

Watershed for water | पाण्यासाठी रानोमाळ भटकंती

पाण्यासाठी रानोमाळ भटकंती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
घोटी : धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यातील जनतेला लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आणि पंचायत समितीच्या दुर्लक्षामुळे कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे भयाण चित्र पाहण्यास मिळत आहे. तालुक्यातील थळघाट आणि पूर्व भागात पाणीटंचाईची दाहकता जाणवत असून, राहायला इगतपुरी तालुक्यात आणि पाण्यासाठी पालघर, ठाणे व नगर जिल्ह्यात महिलांसह मुलांनाही भटकंती करावी लागत आहे.
इगतपुरी तालुक्यातील धरणांच्या साठ्यात या महिन्यात घट झाली असली तरी पिण्यासाठी पाणी आरक्षित असल्याने या धरणातून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र जीर्ण झालेली यंत्रणा, स्थानिक ग्रामसेवकांचे दुर्लक्ष यामुळे या योजना धूळ खात पडून आहेत. इगतपुरी तालुक्यातील थळघाटात असलेल्या चिंचले खैरे या गावातील महिलांना तर पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागत आहे.
रात्र रात्र जागून पाणी मिळविण्यासाठी जीव धोक्यात घालून भटकंती करावी लागत आहे. येथील महिलांना पाण्यासाठी थेट लगतच्या पालघर जिल्ह्यात जावे लागत आहे.

Web Title: Watershed for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.