वाटसरूच्या चाहुलीने फसला चोरीचा प्रयत्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 03:28 PM2020-01-03T15:28:40+5:302020-01-03T15:28:48+5:30

नायगाव : भूरट्या चोऱ्यांनी नागरिक भयभीत नायगाव - सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागात भुरट्या चोरांच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ...

 Watsaru fancier tried to cheat! | वाटसरूच्या चाहुलीने फसला चोरीचा प्रयत्न !

वाटसरूच्या चाहुलीने फसला चोरीचा प्रयत्न !

Next

नायगाव : भूरट्या चोऱ्यांनी नागरिक भयभीत


नायगाव - सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागात भुरट्या चोरांच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी रात्री पुन्हा एकदा मोबाईल दुकानात चोरीचा प्रयत्न वाटसरूच्या चाहुलीने फसल्याने पुन्हा एकदा चोरट्यांना खाली हाताने परतावे लागले आहे.
नायगाव खो-यात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने या चोरांची सध्या परिसरात दहशत निर्माण झाली आहे.बुधवारी रात्री जायगाव रस्त्यावरील विराज सोमनाथ नाईक यांच्या ओमसाई मोबाईल व ईलेट्रीक या दुकात दोन चोरांनी केलेला चोरीचा प्रयत्न सुरू असतांना वाटसरूच्या चाहुलीने चोरीचा प्रयत्न फसल्याची घटना सी.सी.टिव्हीमुळे उघडकीस आली आहे. यावेळी रस्त्याने आलेल्या दुचाकीवरील तीन युवकांनी या चोरट्यांचा केलेला पाठलागही सी.सी.टीव्हीत कैद झाला आहे. तसेच चार दिवसांपूर्वी जायगाव येथील सोमनाथ आबाजी सानप व वाळीबा पोपट गिते यांच्या शेतातून पाच हॉर्सपाँवरचे दोन कृषीपंप चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहे. असेच प्रकार वारंवार घडत असल्यामुळे परिसरात या भुरट्या चोरांचा धुमाकुळ वाढल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान महिनाभरापुर्वी येथिल युनियन बँकेतही दोन चोरांनी चोरीचा प्रयत्न केला होता.मात्र सायरनच्या आवाजामुळे तेथेही चोरीचा प्रयत्न फसला होता. बँकेच्या व मोबाईल दुकानात चोरीचा केलेला प्रयत्न एक सारखाच असल्याचे बोलले जात आहे. तसेच चोरी करतांना वापरले हत्यारे जावेरच सोडुन जाण्याची पध्दत सारखीच आहे.पिहल्या चोरीचा शोध लागण्या आधीच दुसरी चोरी झाल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलीसांनी या परिसरात रात्रीची गस्त सुरू करण्याची मागणी होत आहे.

Web Title:  Watsaru fancier tried to cheat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक