पिंपळगाव टोलवर ‘फास्टॅग’चा सावळागोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 10:00 PM2020-01-16T22:00:12+5:302020-01-17T01:17:15+5:30
टोल भरण्यासाठी वाहनधारकांना रांगेत उभे राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी फास्टॅग लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात वाहनधारकांना फास्टॅगमुळेच अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. फास्टॅगच्या व्हॉलेटमध्ये पैसे जमा असूनही पुन्हा टोलही भरण्याची वेळ वाहनधारकांवर येत आहे. त्यामुळे तासनतास रांगेल उभे रहावे लागत असल्याने व दूरवर रांग लागत असल्याने वाहनधारकांकडून संताप व्यक्त होत आहे.
पिंपळगाव बसवंत : टोल भरण्यासाठी वाहनधारकांना रांगेत उभे राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी फास्टॅग लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात वाहनधारकांना फास्टॅगमुळेच अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. फास्टॅगच्या व्हॉलेटमध्ये पैसे जमा असूनही पुन्हा टोलही भरण्याची वेळ वाहनधारकांवर येत आहे. त्यामुळे तासनतास रांगेल उभे रहावे लागत असल्याने व दूरवर रांग लागत असल्याने वाहनधारकांकडून संताप व्यक्त होत आहे.
पिंपळगाव बसवंत येथील एक वाहनधारकाने टोलनाक्यावरून फास्टॅग विकत घेतले. स्टिकर लावताना त्यांच्या खात्यात १५० रु पये होते, पण टोलनाक्यावरून जाताना फास्टॅगच्या खात्यातून ६० रु पये कापण्यात आले. परत या वाहनधारकाने आपल्या ५० रु पयांचे अतिरिक्त फास्टॅग घेतले. फास्टॅगच्या खात्यात ९० रु पये पूर्ण झाले. मात्र, परत येत असताना टोलनाक्यावर वाहनधारकाला पुन्हा अडविण्यात आले. परत येत असताना ४० रुपये टोल लागतो. खात्यात ९० रु पये असतानाही फास्टॅगच्या खात्यात पैसे कमी असल्याचे सांगण्यात आले. याबाबत संबंधित वाहनधारकाने विचारपूस केली असता फास्टॅगमध्ये १५० रु पयांचे अतिरिक्त बॅलन्स ठेवून वरील टोलचे पैसे ठेवावे, असे टोलनाक्यावरून सांगण्यात आले. त्यांनी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता कर्मचाऱ्यांनी वाहनधारकाचे काहीही ऐकले नाही.
उलट ८० रु पये घेऊन वाहनधारकाला सोडले. फास्टॅगमध्ये पैसे असतानाही अशा पद्धतीची अडचण व टोलच्या कर्मचाºयांची अरेरावी अनेक वाहनधारकांना सहन करावी लागत आहे.
काही वाहनधारकांनी आपल्या वाहनांना फास्टॅग लावलेला नसल्यामुळे पिंपळगावच्या टोलनाक्यावरील १६ लेनपैकी ५ लेन कॅशसाठी व उरलेल्या ११ लेन फास्टॅगसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. हे वाहनधारकांना समजावे म्हणून १०० मीटरवर फास्टॅग व कॅशची लेन दाखविण्यासाठी दिशादर्शक म्हणून कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यामुळे आता टोल प्रशासन वाहनधारकांसाठी कोणती उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फास्टॅगसाठीची अंतिम मुदत संपली
आरटीओ कार्यालयातील नवीन वाहन विकत घेणाºया वाहनांना तसेच वाणिज्यिक वाहनधारकांना गेल्या दोन वर्षांपासून फास्टॅग लावण्याची सक्ती केली जात आहे. पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावरून शहरात ६० टक्के वाहनांना फास्टॅग लावण्यात आलेले आहेत. तरीही उर्वरित ४० टक्के वाहने अजूनही फास्टॅग विनाटोलनाक्यावर गोंधळ निर्माण करत आहेत. त्यातच फास्टॅग लावण्यासाठी १५ जानेवारीची मुदतही संपल्याने वाहनधारकांना टोलनाक्यावरील गर्दीचा सामना करावा लागत आहे.
ही अनामत रक्कम आहे का?
४वाहनचालकाच्या फास्टॅग खात्यावर टोलनाक्यावरील टोल रकमेइतकी रक्कम असतानाही त्यांच्याकडून रोख स्वरूपात टोल वसूल केला जात आहे. त्यासाठी टोलनाक्यावरील कर्मचाºयांकडून कारण देण्यात आले ते असे की, जेवढी रक्कम टोल म्हणून वसूल केली जाईल त्याशिवाय अतिरिक्त रु पये फास्टॅग खात्यावर असण्याची सक्ती केली जात आहे. पुढे जर वाहनधारक प्रवासच करणार नसेल तर ही रक्कम कशासाठी, ही अनामत रक्कम आहे का? असा सवालही वाहनधारक करीत आहेत. ही रक्कम कायमस्वरूपी का जमा करायची? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
आपल्या खात्यात किती अनामत रक्कम असावी ही बँकेची पॉलिसी आहे. फास्टॅगमधून पैसे कट नाही झाले तर टोलनाक्यावर कॅश भरावीच लागणार. त्यामुळे वाहनधारकांना अनामत रक्कम ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून टोलनाक्यावर रक्कम भरण्यासाठी थांबावे लागणार नाही.
- हर्षल चौधरी, टोलनाका व्यवस्थापक, पिंपळगाव बसवंत
शहरातून बहुतेक नागरिक किंवा वाहनधारक बाहेर जात नाहीत. फास्टॅगमध्ये टोलनाक्यावर जितके पैस लागतात. तितकेच पैसे ठेवण्याबाबत परवानगी देण्यात यावी.
- सुमित जाधव,
वाहनधारक, पिंपळगाव बसवंत