सिन्नर पालिकेसमोर ‘प्रहार’चे लाटनं आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 04:05 PM2020-06-19T16:05:45+5:302020-06-19T16:06:16+5:30

सिन्नर : शहरातील मातंगवाडी, पंचायत समिती परिसरातील वस्ती तसेच सरदवाडी रोड परिसरातील उपनगरांमध्ये मुलभुत सुविधांची वाणवा असून गटारी, सांडपाणी व्यवस्थापन, पथदीप आदी मुलभूत सुविधाच्या पुर्ततेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी नगर पालिकेसमोर लाटणं आंदोलन करत मुख्याधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

Wave of 'Prahar' agitation in front of Sinnar Municipality | सिन्नर पालिकेसमोर ‘प्रहार’चे लाटनं आंदोलन

सिन्नर पालिकेसमोर ‘प्रहार’चे लाटनं आंदोलन

Next

सिन्नर : शहरातील मातंगवाडी, पंचायत समिती परिसरातील वस्ती तसेच सरदवाडी रोड परिसरातील उपनगरांमध्ये मुलभुत सुविधांची वाणवा असून गटारी, सांडपाणी व्यवस्थापन, पथदीप आदी मुलभूत सुविधाच्या पुर्ततेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी नगर पालिकेसमोर लाटणं आंदोलन करत मुख्याधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
सरदवाडी रोड परिसरातील गुरूप्रसाद सोसायटी, कमलनगर, मॉडेल कॉलनी, वाजे लॉन्स परिसरात नगपालिकेच्यावतीने रस्त्याचे काम सुरु असताना जेसीबीमुळे शौचालयाचे चेंबर फुटले. त्यामुळे सदर शौचालयाचे पाणी रस्त्यावर येत आहे. दुर्गंधीे, डासांमुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यात कोरोना संकट आहेत. त्यामुळे रहिवासी घाबरलेले असून महिनाभरापुर्वी सदरची कामे करण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांमध्ये विशेषत: महिलांमध्ये संतप्त वातावरण आहे.
नगरपालिकेने तातडीने मुलभुत सुविधांची कामे न केल्यास आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष दौलत धनगर, युवा शहराध्यक्ष संदीप लोंढे, अर्जुन घोरपडे, बोडके दादा, कुलकर्णी, खंंडु सांगळे, दोडके आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: Wave of 'Prahar' agitation in front of Sinnar Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक